Anup Dhotre Akola Lok Sabha Winner: अकोल्यात वंचितने काँग्रेसचा घात केला, भाजपचं कमळ फुललं

Akola Lok Sabha 2024 Results LIVE Anup Dhotre Lok Sabha Winner: अकोला मतदारसंघात अखेर पुन्हा एकदा भाजपचं कमळ फुललं आहे. भाजपचे अनूप धोत्रे हे मतमोजणीच्या 28 व्या फेरीत विजयी झाले आहेत.
Anup Dhotre
Anup DhotreSarkarnama

Anup Dhotre Akola Lok Sabha Winner: अकोला मतदारसंघात अखेर भाजपचं कमळ फुललं आहे. भाजपचे अनूप धोत्रे हे मतमोजणीच्या 28 व्या फेरीत विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना पिछाडीवर टाकत तब्बल 40 हजार 12 मतांनी धोत्रे यांचा विजय झाला आहे.

अकोला मतदारसंघ हा राज्यातील अनेक चर्चेतील मतदारसंघापैकी एक होता. हा मतदारसंघ भाजपचा गड म्हणून ओळखला जातो. मागील 4 निवडणूकांमध्ये (Election) भाजपचा खासदार आहे. 2004, 2009, 2014 आणि 2019 अशा चार निवडणूकांमध्ये विजय मिळवत भाजपचे खासदार संजय धोत्रे यांनी अकोल्याचा गड कायम राखला होता. तीच परंपरा त्यांच्या मुलाने कायम राखली आहे.

यंदाच्या निवडणूकीत संजय धोत्रेंऐवजी त्यांचा मुलगा अनुप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे डॉ. अभय पाटील आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्यात लढत झाली. अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी खुद्द भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यात येवून सभा घेतल्या होत्या याचा फायदा आता महायुतीला झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Anup Dhotre
Marathwada Lok Sabha Election Result 2024 Live: मराठवाड्यात महायुतीचा सुपडासाफ, बीड, संभाजीनगर वगळता 6 मतदारसंघात 'बॅकफूट'वर

अकोला लोकसभा मतदारसंघातील या तिरंगी लढतीची सर्वांना उत्सुकता लागून होती. अखेर ही उत्सुकता संपली असून या मतदारसंघातील मतदारांनी पुन्हा एकजा भाजपला साथ दिल्याचं पाहायला मिळालं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com