Nashik Lok Sabha Constituency : नाशकात महायुतीचं ठरलं; छगन भुजबळ भिडणार ठाकरे गटाच्या वाजेंना!

Mahayuti News : नाशिक लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. महायुतीचा या जागेबाबत वाद होता. त्याविषयी रविवारी सायंकाळी झालेल्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत नाशिकची जागा राष्ट्रवादीला सोडण्यात येणार आहे.
Chhagan Bhujbal-Rajabhau Waje
Chhagan Bhujbal-Rajabhau WajeSarkarnama

Nashik, 1 April : अखेर नाशिकच्या जागावाटपाचा आणि उमेदवारीचा तिढा सुटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत आज सायंकाळी घोषणा होण्याची शक्यता आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातून (Nashik Lok Sabha Constituency) महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. महायुतीचा (Mahayuti) या जागेबाबत वाद होता. त्याविषयी रविवारी सायंकाळी झालेल्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत नाशिकची जागा राष्ट्रवादीला सोडण्यात येणार आहे. राष्ट्रवादीकडून अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. त्यामुळे आता नाशिकमध्ये माजी आमदार राजाभाऊ वाजे विरुद्ध मंत्री छगन भुजबळ अशी लढत होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chhagan Bhujbal-Rajabhau Waje
Solapur NCP : ‘वंचित’कडून लोकसभेची उमेदवारी; रमेश बारसकर यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

नाशिकमध्ये 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेचे हेमंत गोडसे विजय झाले होते. गतवर्षी शिवसेनेत फूट पडल्यानंतर खासदार गोडसे यांनी ठाकरे गटाची साथ सोडली होती. त्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश करून भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला होता. हा पाठिंबा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारीच्या अटीवर दिल्याचा त्यांचा दावा होता.

यासंदर्भात दोन आठवड्यांपूर्वी शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यात खासदार श्रीकांत शिंदे यांनी गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, त्यानंतर भारतीय जनता पक्षाने त्यात मोडता घातला. राष्ट्रवादी काँग्रेसनेही नाशिकवर दावा सांगितला. त्यामुळे महायुतीमध्ये जोरदार राजकीय वाद होता. त्यावरून शिंदे गटात मोठा तणावही निर्माण झाला आहे. अंतिमत: ही जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सुटली आहे. त्यामुळे हा तणाव आणि नाराजी कोणत्या वळणावर जाते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

Chhagan Bhujbal-Rajabhau Waje
Madha Lok Sabha Constituency : माढ्यात नवा ट्विस्ट; पवारांकडून प्रवीण गायकवाडांना तयारी करण्याची सूचना

नाशिक लोकसभा मतदारसंघातून भुजबळ कुटुंबीयांकडून सलग चौथ्यांदा उमेदवारी करण्यात येत आहे. राष्ट्रवादीने 2009 मध्ये विद्यमान खासदार देविदास पिंगळे यांना बाजूला करून समीर भुजबळांना उमेदवारी दिली होती. त्या निवडणुकीत ते विजयी झाले होते. मात्र, 2014 मध्ये छगन भुजबळ यांनी स्वतः उमेदवारी केली, तर 2019 च्या निवडणुकीत समीर भुजबळ उमेदवार होते. या दोन्ही निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे हेमंत गोडसे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते.

Chhagan Bhujbal-Rajabhau Waje
Ramdas Athawale : "शिर्डीतून उमेदवारीसाठी फडणवीसांनी प्रयत्न केले, पण शिंदेंना अडचण होती, कारण...", आठवलेंनी स्पष्टच सांगितलं

भुजबळ यांनी यंदा पुन्हा एकदा आपले राजकीय कसब दाखवत खासदार हेमंत गोडसे यांनाच बाजूला केले आहे. त्यामुळे नाशकात भुजबळ विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे वाजे अशी लढत होणार आहे. शांतीगिरी महाराजही अपक्ष उमेदवार अर्ज भरणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक आता वेगळ्या टप्प्यावर पोहोचली आहे. राजकीयदृष्ट्या राज्यभर ती चर्चेचा विषय असेल. त्यात छगन भुजबळ यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. भारतीय जनता पक्ष त्यांना किती साथ देतो, यावर पुढील गणित ठरेल.

Edited By : Vijay Dudhale

R

Chhagan Bhujbal-Rajabhau Waje
Chhagan Bhujbal News : छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ; सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी उद्या सुनावणी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com