Loksabha Election 2024 : 'लोकसभा निवडणुकीत भाजपचं मताधिक्य सात ते आठ टक्क्यांनी वाढणार'; बावनकुळेंचा दावा!

Chandrasekhar Bawankule News : सहा ते सात जागांवर पेच मात्र महायुतीमध्ये जागावाटपाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात, असंही सांगितलं आहे.
Chandrasekhar Bawankule
Chandrasekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

BJP and Loskabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. महाराष्ट्रात सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीकडून अद्याप सर्व जागांवरील उमेदवारांची घोषणा झालेली नाही. सर्वच पक्ष उमेदवारी देताना, अगदी पारखून-निरखून उमेदवार देत आहेत, तर बऱ्याच जागांवर अद्यापही एकमत झाले नसल्याने, या जागांबाबतचा घोळ कायम आहे.

मात्र या जागांबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून, लवकरच निर्णय होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी एक दावा केला आहे. भाजपचं मताधिक्य आठ टक्क्यांनी वाढणार असल्याचं बावनकळे म्हणाले आहेत.

नागपूरमधील कोराडी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना बावनकुळे(Chandrasekhar Bawankule) म्हणाले, 'सहा-सात जागांवर पेच असून, त्यावर लवकर निर्णय होईल महायुतीमध्ये जागावाटपाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात असून, येत्या दोन तीन दिवसांत चित्र स्पष्ट होईल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chandrasekhar Bawankule
Lok Sabha Election 2024 : मुलं नाही, तुम्ही लढा आणि निर्णय तत्काळ कळवा; कॉंग्रेस श्रेष्ठींची गुगली !

याशिवाय, 'रामटेक गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे आहे, सध्या रामटेक शिवसेनेकडेच आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल, तर अमरावतीची जागा भाजपकडे असून, 100 टक्के भाजपच्या चिन्हावर लढू. देशात मोदी प्रधानमंत्री व्हावे, यासाठी सर्व प्रयत्न करतील. संभाजीनगर जागेबाबत कोणताही तिढा नाही तर मुंबईच्या जागांबाबत एकनाथ शिंदे(Eknath Shinde) निर्णय घेतील. मनसे किंवा इतरांमुळे उमेदवार जाहीर करण्यास वेळ होत नाही,' असंही बावनकुळे म्हणाले.

याचबरोबर 'महायुतीमधील भाजपसह(BJP) सर्व 13 घटक पक्ष एकत्र निवडणूक लढविणार आहेत. प्रत्येक बूथवर आम्ही लक्ष केंद्रित केले. मोदी सरकारच्या काळात 50 वर्षांत जे मिळाले नाही ते 10 वर्षांत मिळाले. या निवडणुकीत भाजपला सात ते आठ टक्के जादा मते मिळतील. 51 टक्के मतदान घेऊन महाराष्ट्रात 45 प्लस जागा महायुतीला मिळतील. पंतप्रधान कोण व्हावा हे जनतेला चांगले कळते,' असेही या वेळी बावनकुळेंनी सांगितलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Chandrasekhar Bawankule
Amravati Lok Sabha Constiruency : भाजपच लढवणार अमरावतीची जागा, पण उमेदवार कोण?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com