Loksabha Election 2024 : 'निवडून आल्यानंतर प्रतापराव जाधवांचं..' ; आमदार फुंडकरांनी व्यक्त केल्या कार्यकर्त्यांचा भावना!

Akash Fundkar and Prataprao Jadhav : महायुतीमधील आमदारानेच मित्र पक्षाच्या खासदाराबाबत असं विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून, तर्कवितर्क लगवाले जात आहेत.
Akash Fundkar and Prataprao Jadhav
Akash Fundkar and Prataprao JadhavSarkarnama
Published on
Updated on

Buldana Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभीमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जास्तीत जास्ता जागा आपल्याकडे कशा येतील, त्या दृष्टीने डावपेच आखण्यास आणि उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. तर इच्छुक उमेदवारांकडूनही जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.

सत्ताधामी महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून काही ठिकाणी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी संभाव्य उमेदवार कामाला लागले आहेत. जागा वाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात असून, लवकरच सर्वच मतदारसंघातील उमेदवारांची नाव दोन्ही बाजूंकडून जाहीर होणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Akash Fundkar and Prataprao Jadhav
Chandrapur Lok Sabha Constituency : काँग्रेस लाथाळ्या पडताहेत भाजपच्या पथ्थ्यावर !

दरम्यान याच पार्श्वभूमीवर बुलढाणा लोकसभा मतदार संघाच्या(Buldana Lok Sabha Constituency) महायुतीच्या उमेदवाराची अद्यापही घोषणा झालेली नाही मात्र संभाव्य उमेदवार म्हणून शिवसेना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ते कार्यकर्ता मेळावा घेत आहेत.

याचप्रमाणे रविवारी खामगाव येथे पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात भाजप आमदार आकाश फुंडकर(Akash Fundkar) ही उपस्थित होते. यामेळाव्यात फुंडकर यांनी महायुतीला खासदार प्रतापराव जाधवांना टोला लगावला आहे. ज्याची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू असून, विविध तर्कवितर्क लावले जात आहे.

Akash Fundkar and Prataprao Jadhav
Lok Sabha Election 2024 : 'त्या' फोननंतर ‘या’ मतदारसंघासाठी भाजपने ठरवली आहे 'ही' पात्रता !

आमदार आकाश फुंडकर आपल्या भाषणात म्हणाले की, " निवडून आल्यानंतर खासदार प्रतापराव जाधव यांचं दर्शन हे दुर्लभ होत असतं, असं मी म्हणत नाही तर असं कार्यकर्ते म्हणतात.". याचा अर्थ प्रतापराव जाधव हे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना भेटत नाही आणि त्यामुळे यापुढे अशी चुकी करू नये, अशा कानपिचक्याही आपल्या भाषणातून भाजपा आमदार आकाश फुंडकर यांनी दिल्या.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com