
Nagpur News : भाजप महायुती सरकारचा आज शपथविधी सोहळा अवघ्या काही तासांत होईल. देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे आज राज्याचे प्रमुख म्हणून मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
महायुतीने सत्ता स्थापनेचा प्रस्तावसुद्धा राज्यपालाकडे सादर केला आहे. सोबतच महायुती सरकारच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनाचीही तारीख ठरवण्यात आली आहे. 16 डिसेंबरपासून अधिवेशन घेण्यात येणार असून एक आठवड्याचे कामकाज सध्या निश्चित करण्यात आले आहे.
विधिमंडळ सचिवालायचे कर्मचारी 10 डिसेंबरला नागपूरमध्ये दाखल होणार आहेत. 16 डिसेंबरपासून अधिवेशनाला सुरवात होणार असल्याचे त्याची तयारी केली जाणार आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासाठी हिवाळी अधिवेशन नवे नाही. विरोधात असताना त्यांनी अनेक अधिवेशने गाजवली आहेत. सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले आहे. पाच वर्षे मुख्यमंत्री असताना त्यांनी विरोधकांनाचा सामनाही केला आहे.
हिवाळी अधिवेशनाकडे प्रामुख्याने विदर्भातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून असते. शेतकऱ्यांपासून विविध संघटनांचे रोज मोर्चे धडकतात. आंदोलने केली जातात. हिवाळी अधिवेशनाच्या काळात गोवारी समाजावर लाठी हल्ला झाला होता. त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार (MVA) कोसळले. भाजपच्या पाठबळावर एकनाथ शिंदे यांचे महायुतीचे आणि आता देवेंद्र फडणवीस यांच्या यांच्या नेतृत्वात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन होत आहे. यामुळे हिवाळी अधिवेशनाकडून सर्व वैदर्भीयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
महायुतीचे आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले होते. सोबतच शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्याचा निर्णयसुद्धा घेतला आहे. या निर्णयावर हिवाळी अधिवेशनात काय निर्णय होतो, याकडे आता लक्ष लागले आहेत.
फडणवीस यांनी वैनगंगा-नळगंगा हा नदीजोड प्रकल्प जाहीर केला आहे. 80 हजार कोटींचा खर्च यासाठी अपेक्षित आहे. विदर्भाला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी सोडला आहे. हे बघता पहिल्या अधिवेशान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.