Nagpur Accident News : नागपूरमध्ये रविवारी रात्री भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ऑडी कार चालकाने चार ते पाच गाड्यांना उडवले. गाडी चालवणारा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप होतो आहे.
गाडी चालवणारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. याविषयी अंधारे यांनी ट्विट देखील केले आहे.
अंधारे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'रविवारी रात्री नागपूरच्या रामदासपेठमध्ये महागड्या इलेक्ट्रॉनिक ऑडीने अनेक गाड्या उडवल्या. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालक संकेत बावनकुळे असल्याचे समोर येत आहे. मात्र आश्चर्य की आरटीओने गाडीचा नंबर न नोंदवता ही गाडी सोडून दिली.'
सुषमा अंधारे यांनी ट्विट करताना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या साठी कायदा वेगळा का? असा सवाल देखील उपस्थित केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या प्रकरणी गु्न्हा नोंदवला असून बावनकुळे यांचा मुलगा गाडी चालवत नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. गाडीचा ड्रायव्हरच ही गाडी चालवत होता. आणि त्याच्यासोबत संकेत बावनकुळे यांचा एक मित्र होता, अशी माहिती आहे.
पोलिसांनी याप्रकरणी कार चालवणारा चालक अर्जुन हावरे आणि त्याच्या शेजारी बसलेल्या रोनित चिंतमवार यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यांच्या रक्ताचे नमुने देखील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या अपघातामध्ये सुदैवाने कोणीतीही जीवितहानी झाली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.