Amravati Politics : हा भाऊ ‘ताई’ला मुख्यमंत्रीही करेल...जानकरांची मोठी घोषणा

Upset on BJP : पंकजा मुंडेंच्या मुद्द्यावर वक्तव्यानं राजकीय चर्चांना उधाण
Mahadev Jankar & Pankaja Munde.
Mahadev Jankar & Pankaja Munde.Google

Mahadev Jankar on Pankaja Munde : विविध कारणांमुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या भाजपच्या नेत्या आमदार पंकजा मुंडे यांच्या मुख्यमंत्री पदाचा विषय पुन्हा एकदा पुढं आलाय. भाजपवर नाराजी व्यक्त करीत भारत समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी मुंडे यांच्याबाबत आपली आतापर्यंत सगळ्यात मोठी भूमिका जाहीर केली आहे.

जानकर गुरुवारी (ता. 23) अमरावती येथे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. जानकर यांचा पक्ष भाजपचा मित्र आहे. परंतु अलीकडच्या काळात जानकर भाजपवर नाराज असल्याचं या वेळी दिसून आलं. (Mahadev Jankar Says At Amravati That He Will Make Pankaja Munde CM Whenever His Party Will Have 145 MLA In Maharashtra)

Mahadev Jankar & Pankaja Munde.
Amravati University : उमेदवारांकडून राजभवनापर्यंत पोहोचण्याच्या मार्गाचा शोध सुरू

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांनी आपल्याला मुलगा मानलं होतं. त्यामुळे पंकजा मुंडे या माझ्या बहीण आहेत. भाजपनं त्यांना मुख्यमंत्री करावे किंवा नाही, हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु एका बहिणीसाठी भाऊ काहीपण करू शकतो. त्यामुळे आपल्या पक्षाकडे 145 आमदारांचं संख्याबळ झालं तर आपण पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनाच महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनवू, अशा स्पष्ट शब्दांत महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी आपल्या मनात काय ते सांगितलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार (Ajit Pawar) सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर जानकर यांनी भाजपवर निशाणा साधला होता. पक्षवाढीप्रमाणे भाजपची गुर्मी वाढली आहे, भाजप लवकरच गुंडाळून जाईल, अशी टीका जानकर यांनी भाजपवर (BJP) केली होती. सत्तेचा फायदा घेणारे अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. सामान्य माणूस शरद पवार, उद्धव ठाकरेंसोबत आहे. पवार आणि ठाकरेंना सहानुभूती आहे, असंही जानकर म्हणाले होते. मागच्या सरकारमध्ये केलेल्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी काही जण सत्तेत गेले. पांढरे कपडे घालून, चमचमीत गॉगल लावून गाड्यांमधून फिरणारे एकनाथ शिंदे, अजित पवारांसोबत गेले, असा घणाघातही जानकरांनी केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये पंकजा मुंडे यांची घुसमट होत असल्याचं बोललं जात आहे. अनेक नेत्यांनी त्या भाजपतून बाहेर पडतील असं नमूद केले आहे. राज्यातील सध्याचं राजकारण पाहता कोण कोणत्या पक्षात आहे, हे कळेनासं झालं आहे. भाजप वगळता जवळपास सर्वंच पक्षांमध्ये बंडखोरीनं डोकं वर काढले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर मोठी फूट पडली आहे. कदाचित त्यामुळं पंकजा मुंडे सध्या ‘वेट अॅन्ड वॉच’च्या भूमिकेत असाव्यात, असं सांगितलं जात आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Mahadev Jankar & Pankaja Munde.
Amravati : पीक विम्यासाठी शेतकरी आक्रमक, कंपनीच्या अधिकाऱ्यावर उगारली खुर्ची

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com