Eknath Shinde : महाविकास आघाडीचा जाहीरनामा कॉपीपेस्ट, मुख्यमंत्र्यांनी डागली तोफ

Assembly Election Eknath Shinde MVA : आमचे सरकार देणारे आहे. महाविकास आघाडीचे सरकार हप्ते घेणारे होते. म्हणूनच ते कोसळले, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde News : महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेला विरोध करणारे, बंद पाडण्यासाठी कोर्टात जाणारे आता आम्ही चार हजार देतो, असे सांगू लागले आहेत. या सर्व थापा आहेत. महाविकास आघाडीचा जाहीरनामा कॉपीपेस्ट असून आम्ही सुरू केलेल्या योजना त्यांनी ढापल्या असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

ज्यांनी तुमच्या योजनेत खोडा घातला त्यांना निवडणुकीत जोडा दाखवा, असे आवाहन करून मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर तोफ डागली.

मुख्यमंत्र्यांनी आज (गुरुवारी) महायुतीच्या उमेदवारासाठी विदर्भात प्रचारसभा घेतल्या. यात नागपूर, देवलापार, भंडाराचा समावेश होता. आपल्या भाषणात त्यांनी दिवाळीचे फटाके राखून ठेवा, 23 तारखेला विजयाचे फटाके फोडायला कामी येतील, असे आवाहन केले.

काल महाविकास आघाडीने जाहीनाम्याचा माध्यमातून पंचसूत्री दिल्याचे ऐकले. मात्र ती थापासुत्री आहे. त्यातही आमच्याच सर्व योजना ढापण्यात आल्या आहेत. आम्ही लाडक्या बहिणीला 1500 रुपये देत आहोत. आतापर्यंत पाच हप्ते माझ्या बहिणींच्या खात्यात जमा केले आहे. आमचे सरकार देणारे आहे. महाविकास आघाडीचे सरकार हप्ते घेणारे होते. म्हणूनच ते कोसळले, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

CM Eknath Shinde
Dhanjay Munde : 'तुमचे राष्ट्रीय नेते अद्याप अविवाहितच'; धनंजय मुंडेंची आघाडीच्या उमेदवारावर खोचक टीका

लाडकी बहीण योजनेला लाच आणि आमिष दाखवणे म्हणाणाऱ्यांनी आता महालक्ष्मी योजनेची पुडी सोडली आहे. युवकांना चार हजार देतो म्हणातात. आम्ही तर देणे सुरूही केले आहे. 10 लाख युवकांना प्रशिक्षण देण्याचा मेगा कार्यक्रम राज्यात सुरू केला आहे. या माध्यमातून त्यांनी प्रशिक्षण, प्रशिक्षण भत्ता आणि नोकऱ्याही दिल्या जाणार आहेत, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

लेक लाडकी लखपती योजना सुरू केली. मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत केले. शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केले. भावांतर योजना सुरू केली. महाविकास आघाडी अडीच वर्षे सत्तेत होती. यावेळी तुम्ही काय केले? अशी विचारणाही मुख्यमंत्री शिंदे यांनी आघाडीच्या नेत्यांना केली. शेतकऱ्यांचे कर्जसुद्धा माफ करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. 'पिक्चर अभी बाकी है' असे सांगून मुख्यमंत्री शिंदे यांनी लहन मुलासारखे रडगाणे बंद करा असा टोला उद्धव ठाकरे यांना लगावला.

CM Eknath Shinde
OBC Leader Laxman Hake News : मनोज जरांगेंची लायकी बिग बाॅसमध्ये जाण्याची, मुख्यमंत्र्यांना कायदा कळतो का ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com