Devendra fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर निशाणा; म्हणाले, 'मतांसाठी विदर्भात...'

devendra fadnavis Vs Sharad pawar : दोन दिवसांपासून शरद पवार नागपूरमध्ये मुक्कामी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मतदारसंघात ते सभा घेत आहे.
Devendra Fadanavis  Sharad pawar
Devendra Fadanavis Sharad pawar sarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis News : राज्यात तब्बल 15 वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार होते. त्यांनी एकही आयकॉनिक काम केले नाही. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय शरद पवार हे फक्त मतांसाठीच विदर्भात येतात, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवार) नागपूरमधील जाहीर सभेतून केला.

दोन दिवसांपासून शरद पवार नागपूरमध्ये मुक्कामी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मतदारसंघात ते सभा घेत आहे. त्यांच्या आरोपांचा सर्व रोख देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. भाजपच्या काळात अनेक मोठे प्रकल्प राज्यातून गुजरातला पळवले, नागपूरच्या मिहानमध्ये येऊ घातलेल्या विमानाच्या निर्मितीचाही प्रकल्प राज्यातून गेला असल्याचे त्यांना आरोप केला आहे.

Devendra Fadanavis  Sharad pawar
Pankaja Munde News : महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाबाबत पंकजा मुंडेंचे मोठं विधान; म्हणाल्या..

आज फडणवीस यांनी नागपूरमध्ये तीन सभा घेतल्या. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर पलटवार केला. ते म्हणाले, शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते. पंधरा वर्षे आघाडीचे आणि त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार त्यांच्या नेतृत्वात स्थापन झाले. मात्र विदर्भाच्या खऱ्या विकासाला सुरुवात 2014 मध्ये भाजप सत्तेवर आल्यावर झाली. सत्ता हातून गेल्यानंतर शरद पवार यांना विदर्भ आठवायला लागला आहे. निवडणूक आली की ते हमखास मते मागायला येता आणि निघून जातात असाही आरोप फडणीस यांनी केला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही लाडकी बहीण योजना आणली तेव्हा राज्य दिवाळखोरीत काढायल निघाले, असा आरोप केले जात होता. योजना बंद पाडायला काँग्रेसने काहींना कोर्टात पाठवले. काँग्रेसला मत म्हणजे लाडकी बहीण योजना बंद पाडणे आहे. आपल्या सभोवतालचे अनेक सावत्र भाऊ तसे प्रयत्न करीत आहेत. त्यांच्यापासून सावध राहा असे आवाहनही यावेळी फडणवीस यांनी बहिणांनी केले.

Devendra Fadanavis  Sharad pawar
Ramtek Assembly Election : केदारांनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली; भास्कर जाधवांनी डागली तोफ

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com