Pankaja Munde News : महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाबाबत पंकजा मुंडेंचे मोठं विधान; म्हणाल्या..

Political News : सर्वत्र प्रचार सभांचा धुराळा उडाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच राज्यातील प्रमुख नेते मंडळींनी सर्वच मतदारसंघ पिंजून काढले आहेत.
Pankaja Munde
Pankaja Munde Sarkarnama
Published on
Updated on

Nagar News : विधानसभा निवडणुकीसाठी लवकरच मतदान होत आहे. त्यामुळे सर्वच पक्षाने जोरदार प्रचार सुरू केला आहे. सर्वत्र प्रचार सभांचा धुराळा उडाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच राज्यातील प्रमुख नेते मंडळींनी सर्वच मतदारसंघ पिंजून काढले आहेत. त्यातच दुसरीकडे महायुतीमधील मुख्यमंत्रीपदाबाबत जोरदार चर्चा सुरु आहे.

शुक्रवारी सांगली जिल्ह्यातील सभेवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच येत्या काळात मुख्यमंत्री होतील, असे संकेत दिले आहेत. यावर बोलताना भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं विधान केले आहे. ( Pankja Munde News)

भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची प्रचार सभा अहमदनगरच्या राहुरी मतदारसंघातील शिराळ- चिचोंडी येथे पार पडली. राहुरी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले आणि शेवगाव पाथर्डी येथील उमेदवार मोनिका राजळे यांच्या प्रचारासाठी ही सभा घेण्यात आली. या सभेसाठी भाजप कार्यकर्त्यांसह पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.

महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी मोठे विधान केले आहे. येत्या काळात महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री असतील असे संकेत दिले आहेत. यावर बोलताना पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री कोण होईल ? तो सर्वस्वी अधिकार अमित शहा यांचा असल्याचे सांगत पंकजा मुंडे यांनी त्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे.

Pankaja Munde
OBC Politics : विधानसभा निवडणुकीत ओबीसी मतदार ठरणार 'गेम चेंजर' ? कुठल्या पक्षाला देणार कौल

यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे या राज्यांमध्ये महायुतीचे सरकार येणार असल्याचा विश्वास असून महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित नागरिकांना केले.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीतही राहुल गांधी यांच्याकडून संविधानाचा मुद्दा पुढे केला जात आहे. यावर बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. संविधानात कसलाही बदल झालेला नाही. ते अधिक सक्षम झालेले आहे. त्यामुळे अशा फेक नरेटीव्हचा आता उपयोग होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Pankaja Munde
Amit Deshmukh: 'मुझको राणाजी माफ करना' असे भरसभेत अमित देशमुख का म्हणाले ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com