NCP Politics : नाना पटोलेंना घेरण्यासाठी राष्ट्रवादीने लावली 'फिल्डिंग', पदाधिकारी साकोलीत मुक्कामी

NCP Politics Nana Patole Assembly Election : भंडारा जिल्ह्यात नाना पटोले आणि प्रफुल पटेल यांच्यात वर्चस्वाची लढाई नेहमीच सुरू असते. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी पटोले यांनी विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाची टीकटीक बंद करण्याचा इशारा दिला होता.
 Nana Patole Praful Patel
Nana Patole Praful Patelsarkarnama
Published on
Updated on

NCP Politics : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासाठी साकोली विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने कडक फिल्डिंग लावली आहे. भंडारा जिल्ह्याशी संपर्क असलेल्या विदर्भातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना सोकोलीत मुक्कामी ठेवण्यात आले आहेत. येथे उमेदवार भाजपचा असला तरी प्रफुल पटेलांनी यासर्व हिशेब यावेळ चुकते करण्याच तयारी पुरेपूर केल्याची चर्चा आहे.

भंडारा जिल्ह्यात नाना पटोले आणि प्रफुल पटेल यांच्यात वर्चस्वाची लढाई नेहमीच सुरू असते. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी पटोले यांनी विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाची टीकटीक बंद करण्याचा इशारा दिला होता. यात ते यशस्वीसुद्धा ठरले. महाविकास आघाडीचा उमेदवार पटोले यांनी एकहाती निवडूण आणला. आता मात्र प्रत्यक्ष नाना पटोले यांनाच घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे.

 Nana Patole Praful Patel
Amol Kolhe In Baramati Sabha : खासदार कोल्हेंचा बारामतीत जाऊन अजितदादांना करारा जवाब; अर्धे उपमुख्यमंत्री,गद्दार म्हणत...

2019ची साकोलीची निवडणूक हायप्रोफाईल झाली होती. मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करून पटोले काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. ते नितीन गडकरी यांच्या विरोधात नागपूरमधून निवडणूकसुद्धा लढले होते. त्यांचा हिशेब चुकता करण्यासाठी भाजपनेच आमदार परिणय फुके यांना मैदानात उतरवले होते.

फुके निवडूण येईल अशी जोरदार हवा निर्माण झाली होती. भाजपकडून अतिउत्साहात काही चुका झाल्या. त्याच फुके यांच्यासाठी मारक ठरल्या आणि नाना पटोले यांनी विजय मिळवला.

यावेळी भाजपने अतिशय शांतपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिसून येते. नाना यांच्या विरोधात लढण्यासासाठी जातीपातीपासून तर पोटजातीचा विचार करून उमेदवार निवडला. राष्ट्रवादी काँग्रेसमधून उमेदवारास आयात केले. महिनाभरापासून एकाही भाजपच्या नेत्याने येथे प्रचारात आक्रमकता दाखवली नाही. उलटसुलट आरोप केले नाहीत. शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेस ताकदीने उतरली आहे.

दुसरीकडे नाना पटोले भावी मुख्यमंत्री म्हणून साकोलीत प्रचार करीत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या काही बड्या नेत्यांना ही बाब खटकत आहे. काही छुपी मदतही पक्षांतर्गत विरोधकांची होत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. असे असले तरी उमेदवार आयात केला म्हणून भाजपमधील नाराजी आणि बंडखोरी त्यांच्यासाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

 Nana Patole Praful Patel
Sharad Pawar Video: 'माझी पिढी त्यानंतर अजितची पिढी अन् आता...' शरद पवारांचे बारामतीकरांना आवाहन

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com