Amol Kolhe In Baramati Sabha : खासदार कोल्हेंचा बारामतीत जाऊन अजितदादांना करारा जवाब; अर्धे उपमुख्यमंत्री,गद्दार म्हणत...

Amol Kolhe On Ajit Pawar : अमोल कोल्हेंनी यावेळी लोकसभेला जर शरद पवारांची लाट असेल तर विधानसभेला त्सुनामी आली असल्याचं म्हटलं. तसेच मी महाराष्ट्रभर फिरत असताना मला लोकांनी सांगितलं की मतदानाची तारीख नोव्हेंबर 20,निकालाची तारीख नोव्हेंबर 23 आणि घरी पाठवायचे...
Amol Kolhe, AJit pawar
Amol Kolhe, AJit pawarSarkarnama
Published on
Updated on

Baramati News : लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कसा निवडून येतो तेच बघतो हे आव्हान मोडीत काढत अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) शिरूरचं मैदान मारलं.या विजयानंतर अजित पवारांवर बोलताना आधी कचारणाऱ्या कोल्हेंनी त्यांच्यावर थेट जोरदार हल्ले चढवण्यास सुरुवात केली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात तर अजितदादा -कोल्हेंमध्ये अनेकदा शा‍ब्दिक चकमकी उडाल्या.

अजितदादांनी थेट नकलाकार म्हणत त्यांना डिवचलं होतं. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंनी बारामतीतील युगेंद्र पवारांच्या प्रचाराच्या सांगता सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) 'करारा जवाब' दिला.आपल्या राजकीय कारकि‍र्दीत पहिल्यांदाच बारामतीत जाऊन कोल्हेंनी अजितदादांवर घणाघात केला.

खासदार अमोल कोल्हेंनी सोमवारी (ता.18)बारामतीत लेंडीपट्टा मैदानात सभेत धुवांधार बॅटिंग केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महायुतीवर सडकून टीका केली. पण कोल्हेंनी आपल्या भाषणात अजित पवारांवर जिव्हारी लागणारे घाव घातले. बारामतीत येऊन थेट अजित पवारांनाच टार्गेट केल्यामुळे कोल्हेंनी त्यांच्यावर याआधी करण्यात आलेल्या टीकेचा हिशेब चुकता केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Amol Kolhe, AJit pawar
Mohol Constituency : मोहोळच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; तगड्या अपक्षाचा शरद पवारांच्या उमेदवाराला पाठिंबा

ते म्हणाले, आपल्याला तुम्ही नकलाकार म्हणता.पण मला कोणी नकलाकार म्हणत असेल, तर ते माझ्यासाठी महत्वाचं नाही. कोणी नकलाकार म्हणत असेलही.पण, मला कोणी गद्दार म्हणत नाही.त्यांनी आपल्या भाषणात अजित पवारांचा उल्लेख अर्धे उपमुख्यमंत्री असा करत आता बारामतीचा नवा युगेंद्रदादा असा केला.

अमोल कोल्हेंनी यावेळी लोकसभेला जर शरद पवारांची लाट असेल तर विधानसभेला त्सुनामी आली असल्याचं म्हटलं. तसेच मी महाराष्ट्रभर फिरत असताना मला लोकांनी सांगितलं की मतदानाची तारीख नोव्हेंबर 20,निकालाची तारीख नोव्हेंबर 23 आणि घरी पाठवायचे शिंदे,अजितदादा अन् फडणवीस,असं आपण नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र म्हणत आहे असंही कोल्हेंनी सांगितलं.

Amol Kolhe, AJit pawar
Jay Pawar First Speech In Baramati : जय पवारांनी आपली पहिलीच सभा गाजवली, अवघं पाच मिनिटांचं भाषण, बारामतीकरांच्या टाळ्या अन् शिट्ट्या ....

परवा अर्धे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माझ्या मतदारसंघात येऊन सांगितलं की, अमोल कोल्हेंनी पक्ष बदलले. मात्र, त्यांच्या एजन्सीने चुकीचं सांगितलं असेल. मनसे, भाजपा आणि राष्ट्रवादी. पण आपण कधीच मनसे आणि भाजपमध्ये नव्हतो. मी पक्ष बदलला,मात्र पक्ष चोरला नाही”, असं खोचक टोलाही खासदार कोल्हेंनी यावेळी अजितदादांना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com