Winter Session 2023: उपराजधानीत रंगले राजकीय 'पोस्टर वॉर'

Maharashtra Assembly Winter Session 2023: नेत्यांना खूष करण्यासाठी कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा
Maharashtra Assembly Winter Session 2023:
Maharashtra Assembly Winter Session 2023:Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur Winter Session : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रीद्वय देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ आणि सचिवालय सध्या नागपुरात मुक्कामी आहेत.

आपापल्या पक्षातील नेत्यांची जंगी स्वागत करण्यासाठी सर्वच कार्यकर्त्यांनी स्वागत आणि शुभेच्छा देणारे भले मोठे फलक विधान भवनाच्या दोन किलोमीटर परिसरात लावले आहेत. यामध्ये सर्वाधिक फलक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा व स्वागताचे आहेत.

धरमपेठेतून सिव्हिल लाइन्स रोडमार्गे आकाशवाणीकडे येताना देवगिरी चौकापासून संविधान चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा स्वागत व शुभेच्छा करणारे फलक दिसतात. उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाच्या आसपासही मोठ्या प्रमाणावर फलक दिसतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटांच्या फलकांची संख्या सध्या सर्वात कमी आहे. याशिवाय शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटांचे फलकही इतर पक्षांच्या तुलनेत मोजकेच संकेत आहेत.

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते रावसाहेब दानवे यांच्या स्वागताचे मात्र अनेक फलक दिसत आहेत. विधान परिषदेपासून बऱ्याच अंतरावर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातही स्वागतपर फलक दिसतात. याशिवाय नागपुरात आलेले मंत्री शहराच्या अनेक भागातून जाण्याची शक्यता बघता मोक्याच्या ठिकाणी उड्डाणपुलांच्या दुतर्फा भले मोठे फलक दिसत आहेत.

Maharashtra Assembly Winter Session 2023:
Winter Session 2023 : नवाब मलिकांचं अखेर ठरलं! अजित पवार गटात सहभागी...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटातील नेते तथा ओबीसी समाजातील मंत्री छगन भुजबळ यांच्या स्वागताचेही फलक नागपूरकरांचे लक्ष वेधून घेत आहेत. सार्वजनिक ठिकाणी कोणतेही फलक उभारण्यासाठी नियमावली ठरवून देण्यात आलेली आहे. या नियमांचे काटेकोर पालन केले जावे, यासाठी नागपूर महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन व उपद्रव शोधपथक सातत्याने काम करीत आहे.

विधान भवनाचा परिसर नागपूर महापालिका मुख्यालयाच्या अगदी शेजारीच आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा न्यायालयही याच परिसरात आहे. याशिवाय याच भागातून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडेही अनेक मार्ग जातात. अशावेळी शुभेच्छा व जाहिरात फलकांच्या माध्यमातून नियमांचे उल्लंघन होणार नाही, यावर महापालिका आणि जिल्हा प्रशासनाचे पथक लक्षात ठेवून आहे.

कोणते अनधिकृत फलक तत्काळ काढून टाकण्याची सूचना सरकारकडून जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे, त्यामुळे या निर्देशांचे पालन महापालिका व महसूल प्रशासनाकडून काटेकर पद्धतीने केले जात आहे. अद्यापपर्यंत आम्हाला कोणतेही अनधिकृत फलक आढळले नाहीत. त्यामुळे कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही, असे नागपूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

Maharashtra Assembly Winter Session 2023:
Assembly Winter Session 2023 : अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच वाद पेटला; राष्ट्रवादीच्या कार्यालयातून आव्हाडांची नेमप्लेट हटवली...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com