Maharashtra Assembly Winter Session 2023 : नागपूर अधिवेशनात शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्य सरकारकडे मोठी मागणी केली आहे. येत्या 22 जानेवारीला शासकीय सुट्टी जाहीर करावी, असे प्रताप सरनाईक म्हणाले. प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी सध्या अयोध्येत मंदिर परिसरात जय्यत तयारी सुरू आहे.
काय म्हणाले प्रताप सरनाईक?
समस्त हिंदू समाजाला अभिमान वाटावा अशी घटना येत्या 22 जानेवारीला घडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून राम मंदिराचा उद्घाटन सोहळा संपूर्ण जगाला पाहाता येणार आहे. जानेवारी महिना पुढचं अखंड वर्ष आपल्याला मिळतंय. तर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार एखादी शासकीय सुट्टी रद्द करून त्याऐवजी 22 जानेवारी रोजी शासकीय सुट्टी जाहीर करावी, अशी विनंती आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्य सरकारला केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राम मंदिराचे काम कुठेपर्यंत आले?
अयोध्येतील राम जन्मभूमी येथील राम मंदिराचे उद्घाटन पुढच्या महिन्यात होणार आहे. यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. राम मंदिराच्या पहिल्या मजल्याचे 70 टक्के काम झाले आहे. राम मंदिराचा एकूण परिसर हा अडीच एकर इतका आहे. त्यात 'परिक्रम पथ'चा समावेश केल्यास मंदिराचा संपूर्ण परिसर हा आठ एकर इतका होतो. मंदिर तीन मजली असेल आणि मंदिराची उंची 162 फूट असेल.
मंदिराच्या गर्भगृहात एख चबुतरा उभारण्यात येणार आहे. या चबुतऱ्यावर रामल्लाची मूर्ती स्थापन केली जाणार आहे. प्रभू श्रीरामाची मूर्ती ही 51 इंचाची असेल. मंदिर परिसरात राम मंदिरा शिवाय आणखी सहा मंदिरं बांधली जाणार आहेत. सिंह द्वारातून राम मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी पूर्वेला असलेल्या एका मुख्य द्वारातून भाविक परिसरात येतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.