Congress Politics : विधानसभेचाच कित्ता स्थानिकलाही? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेसची खास मोहीम

Congress demands ballot paper : आज विकसित देशांमध्ये जर्मनी, नेदरलँड, फ्रान्स, अमेरिका यांसारख्या देशांनी निवडणुकीत ईव्हीएम वापरणे पूर्णतः बंद केले असून या देशांनी पारदर्शकता, विश्वसनीयता आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण यासाठी पुन्हा मतपत्रिका प्रणाली स्वीकारली आहे.
Ballot Paper
Ballot PaperSarkarnama
Published on
Updated on
  1. काँग्रेसने विधानसभा निवडणुकीतील निकालावर शंका उपस्थित करत सरकारवर निवडणूक मॅनेज केल्याचा आरोप केला आहे.

  2. या प्रकरणी काँग्रेसने न्यायालयात याचिका दाखल केली असून मतदार यादींची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  3. आगामी स्थानिक निवडणुका बॅलट पेपरवर घेण्याची मोहीमही काँग्रेसने सुरू केली आहे.

Nagpur News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर काँग्रेस नेत्यांची शंका आहे. राहूल गांधी यांनी थेट महायुती सरकारने निवडणूक मॅनेज केली असा आरोप केला आहे. या विरोधात न्यायालयात याचिकासुद्धा दाखल केल्या आहेत. आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही हाच प्रकार होण्याची भीती काँग्रेसने वर्तविली आहे. त्यामुळे सर्व जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वात मतदार याद्या तपासण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोबतच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलट पेपरवर घेण्याची मोहीम काँग्रेसने हाती घेतली आहे. (Congress's concerns over election results and its demand for ballot paper voting in upcoming local body elections in Maharashtra)

काँग्रेसने याकरिता ‘बॅलेट पेपर आणा, लोकशाही वाचवा कृती समिती‘ स्थापन केली आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांची नागपूर कृती समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आज विकसित देशांमध्ये जर्मनी, नेदरलँड, फ्रान्स, अमेरिका यांसारख्या देशांनी निवडणुकीत ईव्हीएम वापरणे पूर्णतः बंद केले असून या देशांनी पारदर्शकता, विश्वसनीयता आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण यासाठी पुन्हा मतपत्रिका प्रणाली स्वीकारली असल्याचे सांगितले.

ही बाब लक्षात घेता भारतासारख्या मोठ्या लोकशाही राष्ट्रात देखील निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी व जनतेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी मतपत्रिकेद्वारे निवडणूक घेणे आवश्यक असल्याचे राऊत यांनी सांगितले. लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात मतदान झाले.

Ballot Paper
Congress Political Crisis : जयश्रीताई जाताच काँग्रेसला गळती? आता प्रदेश उपाध्यक्षच महायुतीच्या वाटेवर; शिंदे-पवार भेटीमुळे चर्चांना उधाण

मोदी सरकारच्या धोरणाच्या विरोधातील रोष जनतेने मतदानातून व्यक्त केला होता. मात्र पाच महिन्यात कुठलीच ठोस कामगिरी न करताही विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सर्वाधिक आमदार निवडून आले. ही बाब अद्यापही कोणालाच रुचलेली नाही. प्रत्येकाच्या मनात निवडणुकीच्या निकालावर शंका आहे. ईव्हीएम मॅनेज केले जात असल्याचा आरोप आहे.

राहूल गांधी यांनी अनेक प्रश्न यावर उपस्थित केले आहेत. निवडणूक आयोगालाही विचारणा केली आहे. त्यांनी मागवलेली नेमकी माहिती मात्र दिली जात नाही. यात निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या डेटाबाबत नियम बदलले आहेत. उमेदवारांना सीसीटीव्हीचे फुटेजही देण्यास मनाई केली जात आहे.

Ballot Paper
Congress Politics : अवघ्या 5 महिन्यांत 41 लाख नवे मतदार? महाराष्ट्र निवडणुकीवर संशय!; काँग्रेसचे राष्ट्रपतींना निवेदन

या सर्व बाबी निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या आहेत. भाजपच्या नेत्यांना त्यांच्या कामगिरीवर एवढाच विश्वास असेल तर निवडणुका बॅलेट पेपवर का घेतल्या जात नाही असा सवाल कुणाल राऊत यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com