Meat Ban Controversy : प्रत्येक वेळी खाटीक समाजावरच अन्याय का? मांस बंदीच्या निर्णयावरून शिंदेंच्या आमदाराचा सरकारला घरचा आहेर

Meat Sale Ban Controversy : राज्यातील महापालिका प्रशासनाने काढलेल्या स्वातंत्र्यदिनी मांस विक्री बंदीच्या आदेशाने आता राजकीय वाद निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने या आदेशाच्या विरोधात भूमिका घेतली आहे.
krupal tumane
Meat Ban ControversySarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 13 Aug : राज्यातील महापालिका प्रशासनाने काढलेल्या स्वातंत्र्यदिनी मांस विक्री बंदीच्या आदेशाने आता राजकीय वाद निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने या आदेशाच्या विरोधात भूमिका घेतली आहे.

दुसरीकडे महायुती सरकारच्यावतीने 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला मांस विक्री बंदीचा आदेश काँग्रेसच्या कार्यकाळापासूनच काढला जातला जात असल्याचा दावा केला आहे. या राजकीय वादात खाटीक समाजाचे नेते म्हणून शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने यांनी आम्ही मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्यास तयार असल्याचे सांगितले.

मात्र, त्याच बरोबर मॉल आणि मोठमोठ्या पंचतारांकित हॉटेलमधून होणाऱ्या मांसाहारी पदार्थांच्या विक्रीवरही बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली आहे. प्रत्येक वेळी छोट्या दुकानदारांवर अन्याय का केला जातो असा सवलाही तुमाने सरकारला केला आहे.

खाटीक समाज, मच्छीमार, चिकन विक्रेते हे सर्व गरीब लोक आहेत. प्रत्येक वेळी त्यांच्यावर अन्याय करणे योग्य नाही. छोट्या खाटिकांचे दुकान बंद केले जातात. मात्र, पॅकिंग मध्ये मोठ्या हॉटेलमध्ये ते सर्व मिळते. मोठ्या मॉलमध्ये पॅकिंग स्वरूपात मिळणाऱ्या मांसाहारी पदार्थांच्या विक्रीवरही सरकारने बंदी घातली पाहिजे, अशी आमची मागणी आहे.

krupal tumane
Eknath Shinde Trouble : आदिती तटकरे अन् गिरीश महाजनांना मान : 9 महिन्यांनंतर नाशिक-रायगडचं चित्र क्लिअर, शिंदेंची कोंडी

सरकारचा आदेश असेल तर मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्यास आमचा विरोध नाही. मात्र फक्त गरीबांवरच बंदी लादल्या जात असेल तर त्यास आमचा विरोध असल्याचे तुमाने यांनी स्पष्ट केलं. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मांस विक्रीला विरोध केला आहे. लोकांनी काय खावे आणि नाही हे आयुक्त ठरवणार का? असा त्यांनी सवाल केला आहे.

स्वातंत्र दिन हा काही धार्मिक सण नाही. त्यामुळे मांस विक्रीवर बंदी घालण्याचे कारण नाही असे त्यांचे म्हणणे आहे. भाजपच्यावतीने स्वातंत्रदिनी मांसविक्रीच्या दुकानांवर बंदी घालण्याचा निर्णय शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना घेतला होत असे सांगण्यात येत आहे. त्यावेळी राज्यात काँग्रेसचे सरकार होते.

krupal tumane
Chandrapur voter list : एकाच झोपडीतील 119 मतांचे रहस्य उलगडले! पत्ता एकच तरीही मतदार बोगस नाहीत, नेमकं प्रकरण काय?

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आता राज्यात महायुतीचे सरकार आहे, स्वातंत्र दिनी मांस विक्रीवर बंद ठेवायची की उघडी याचा निर्णय सरकारने घ्यावा असा सल्ला दिला. काँग्रेसच्या काळातील बंदीचा निर्णय कायम ठेवला असे सरकारचे म्हणणे असेल तर यास त्यांचीही संमती आहे असा याचा अर्थ होते असेही शिंदे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com