Maharashtra TET Exam : दोन हजारांवर शिक्षकांनी घेतला टीईटीचा धसका, पेपरफुटीमुळे नोकरी वाचविण्यासाठी धडपड

Teachers preparing for TET exam : शासनाच्या अशैक्षणिक कामासोबत टीईटीचा अभ्यास करून नोकरी वाचविण्याची केविलवाणी धडपड सध्या शिक्षक करताना दिसत आहे. दरम्यान या शिक्षकांनी पेपरफुटीचा धसका घेतल्याचेही आता समोर आले आहे.
TET exam
TET examSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : नोकरी वाचविण्यासाठी टीईटीचा अभ्यास करणाऱ्या शिक्षकांनी पेपरफुटीचा धसका घेतला आहे. अभ्यास करून मेहनत वाया गेल्याची भावना जिल्ह्यातील २ हजारांवर शिक्षकांनी व्यक्त केली आहे. हे शिक्षक टीईटी अनुत्तीर्ण असून त्यांना २०२८ पर्यंत टीईटी उत्तीर्ण करण्याची मुभा देण्यात आली आहे. न्यायालयाने शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण करण्याचे सूचित केले आहे. त्यानुसार शिक्षकांनी यावर्षी परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी अभ्यास सुरू केला.

शासनाच्या अशैक्षणिक कामासोबत टीईटीचा अभ्यास करून नोकरी वाचविण्याची केविलवाणी धडपड सुरू आहे. मात्र, मागील महिन्यात टीईटीचा पेपर फुटल्याने त्यांनी केलेल्या मेहनतीवर पाणी फेरले. आता पुन्हा अभ्यास करावा लागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले असून मुलांना शिकविण्यासोबत अभ्यास करावा लागणार आहे.

त्यात जनगणना करावी लागणार असून त्यासोबत इतर अशैक्षणिक कामांनाही शिक्षकांना स्वतःला जुंपावे लागणार आहे. केवळ एक हजार ३० शिक्षकांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण केल्याने ते सध्या सेफ झोनमध्ये आहेत. मात्र दोन हजार ५९३ शिक्षकांना आपली नोकरी जाण्याची भीती आहे. राज्य शासनाने टीईटी परीक्षा उत्तीर्ण करण्याची मुदत वाढवून आता ३१ ऑगस्ट २०२८ पर्यंत केली आहे.

TET exam
TET Exam: दिव्यांग उमेदवारांना 15 टक्के गुणांची सवलत मिळणार? शिक्षण आयुक्तांना पत्र

त्यामुळे शिक्षकांना अतिरिक्त वेळ मिळणार आहे. असे असले तरी दोन वर्षांत ही परीक्षा उत्तीर्ण करण्याचे शिक्षकांसमोर आव्हान आहे. न्यायालयाने यापूर्वीच स्पष्ट केले की, शिक्षकांसाठी टीईटी ही अनिवार्य राहणार असून या अटीत शिथिलता दिली जाणार नाही.

TET exam
TET Exam Update : TET पेपरफुटीनंतर परीक्षार्थीसाठी आणखी एक मोठी बातमी : पुर्नपरीक्षा सप्टेंबरपर्यंत लांबण्याची शक्यता, कारणही समोर

टीईटीचा पेपर फुटल्यामुळे अभ्यास करणाऱ्या शिक्षकांसमोर पुन्हा मेहनत घेण्याचे आव्हान आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शिक्षकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. एकीकडे टीईटी परीक्षेचा आग्रह धरायचा आणि दुसरीकडे पेपरकडे दुर्लक्ष करायचे. यामुळे काही दिवसांत शिक्षकांच्या नोकरीवर गदा येणार आहे. सरकारने शिक्षकांची टीईटी परीक्षा रद्द करावी, अशी मागणी आहे.

-प्रवीण फाळके, जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती संघटना, नागपूर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com