Anil Parab,Dhananjay Munde
Anil Parab,Dhananjay MundeSarkarnama

Anil Parab On Farmers : 'ऑपरेशन सक्सेस, पेशन्ट डेड !' अनिल परबांनी शेतकऱ्यांना थेट श्रद्धांजलीच वाहिली

Dhananjay Munde : राज्यातील एक कोटी 57 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाल्याचा सरकारचा दावा
Published on

Maharashtra Winter Session 2023 : राज्यात खरीपात वाट पाहूनही पाऊस पडला नाही, तर रब्बीच्या तोंडावर पावसाने धुमाकूळ घातला. परिणामी शेतकऱ्यांचा हातून दोन्ही हंगामातील पिके जाण्याची भीती आहे. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. यातून मार्ग काढण्याचे राज्य सरकारकडून बांधावर जाऊन वारंवार आश्वासन दिले जात आहेत. मात्र सरकारडून ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप करून हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरल्याचे दिसून येत आहे.

विधानपरिषदेत राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठाकरे गट आक्रमक झाल्याचे दिसून आहे. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नांला उत्तर देण्याचा प्रयत्न कृषीमंत्री धनंजय मुंडे करत होते.त्यांच्या मदतीला इतर मंत्रीही होते. शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आलेल्या सर्व योजनांची आणि मिळालेल्या लाभाची माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली. मात्र ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री अनिल परब यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या अवस्थेबाबत केलेल्या टिप्पणीवरून मोठी खडांजंगी झाली.

Anil Parab,Dhananjay Munde
हिवाळी अधिवेशनाच्या पत्रकार परिषदेत शिंदे-दादांमध्ये बघा काय घडलं?|Eknath Shinde|Winter Session 2023

अनिल परब (Anil Parab) म्हणाले,' राज्यातील शेतकऱ्यांचे जे नुकसान व्हायचे होते ते झालेले आहे. त्यावर शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळणे अपेक्षित होते. आता सरकारच्या वतीने सांगण्यात आल्याप्रमाणे चांगल्या घोषणा होती. शेतकऱ्यांना मदत मिळालीही असेल. मात्र ही स्थिती म्हणजे 'ऑपरेशन सक्सेस पण पेशन्ट डेड' या अवस्थेसारखी झाली आहे.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरकारच्या दुटप्पीपणामुळे शेतकऱ्यांवर वाईट वेळ आल्याचा आरोप करत परब यांनी शेतकऱ्यांना थेट श्रद्धांजलीच वाहिली. ते म्हणाले, 'राज्यातील शेतकऱ्यांना एक मिनिट उभे राहून श्रद्धांजली वाहतो. तसेच ज्यांना वाटते की शेतकऱ्यांचे भले झाले नाही त्यांनी सहभागी व्हावे, आणि भले झाले असे वाटते त्यांनी खाली बसावे,' असे आवाहन करून परब शांतपणे उभे राहिले.

परबांनी घेतलेल्या या भूमिकेचा कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी निषेध केला. जे लोक जिवंत आहेत त्यांना सभागृहातून श्रद्धांजली वाहणे निंदनीय असल्याचे मुंडे म्हणाले. राज्यातील एक कोटी 57लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. ते जिवंत असताना त्यांना अशा प्रकारे सदनात कुठल्या पक्षाच्या सदस्याला शोभतंय. हा संबंध शेतकऱ्यांचा अपमान आहे, असे म्हणत मुंडेंनी परब यांच्या कृतीचा निषेध केला.

(Edited by Sunil Dhumal)

Anil Parab,Dhananjay Munde
Ram Satpute : आमदार राम सातपुतेंना विधानसभा अध्यक्षांनी झापलं; अधिवेशनात नेमकं काय घडलं ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com