Ram Satpute : आमदार राम सातपुतेंना विधानसभा अध्यक्षांनी झापलं; अधिवेशनात नेमकं काय घडलं ?

Rahul Narwekar : सोलापूरातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीकडे सातपुतेंनी वेधले लक्ष
Ram Satpute, Rahul Narwekatr
Ram Satpute, Rahul NarwekatrSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Winter Session 2023 : राज्यात सध्या दूध दरामध्ये वाढ करण्याच्या मागणीवरून शेतकरी आक्रमक झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातही खासगी दूध खरेदी केंद्राकडे दुधाला अत्यल्प दर दिला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. याच पार्श्वभूमी माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम सातपुतेंनी मंगळवारी हिवाळी अधिवेशनामध्ये दूध दराच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली. त्यांचा आक्रमकपणा अधिकच वाढल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आमदार सातपुतेंची चांगलीच कान उघडणी केल्याचा प्रकार घडला आहे.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी राम सातपुतेंनी माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील दूध दराच्या प्रश्नावर आक्रमकपणे भूमिका मांडली. खासगी दूध खरेदी केंद्राकडून कोल्हापूर सांगली जिल्ह्यात दुधाला 34 ते 35 रुपये प्रतिलिटरचा दर दिला जात आहे. मात्र सोलापूरमधील शेतकऱ्यांना केवळ 26 रुपये दर मिळत आहे. येथील खासगी दूध संघाची 'मोनोपॉली' झाली आहे.

Ram Satpute, Rahul Narwekatr
Uddhav Thackeray : सरकारला पेन्शनसाठी 'टेन्शन' देण्याची गरज; कर्मचाऱ्यांच्या खांद्यावरून ठाकरेंचा निशाणा

'आमचा दुग्ध उत्पादक शेतकरी हा पहाटे चार वाजल्यापासून काम करतो. गाईंची स्वच्छता सेवा करण्याचे काम करतो, दूध उत्पादन करतो. मात्र आज घडीला पशुखाद्याच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे दुग्ध उत्पादकांना लिटरला 26 रुपये खर्च येतो. परंतु या दूध खरेदी संघटनांच्या 'मोनोपॉलि'मुळे शेतकऱ्यांना केवळ 26 रुपयेच भाव मिळत आहे.' पाण्याच्या बाटलीच्या किमती इतका दर दुधाला मिळत असल्याकडेही सातपुतेंनी लक्ष वेधले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सातपुते (Ram Satpute) यांनी सभागृहात सरकारला विनंती केली की, शेतकऱ्यांच्या दुधाचे दर वाढले पाहिजे, शेतकऱ्यांना 34 रुपये प्रतिलिटर हमी भाव मिळालाच पाहिजे, अशी मागणी सातपुतेंनी सरकारकडे केली. यावेळी आक्रमक झालेल्या आमदार सातपुतेंनी खासगी दूध संघाकडून शेतकऱ्यांची लुबाडणूक होत असल्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधत अडचणीत सापडेलल्या दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांची वास्तव परिस्थिती कथन केली.

दरम्यान, दूध दराचा मुद्दा मांडत असताना राम सातपुते हे अधिकच आक्रमक झाले होते. दुधाला कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मिळणाऱ्या दराच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यातील दूध दर हा उत्पादन खर्चाइतकाच मिळत असल्याचे आमदार सातपुते हे पोटतिडकीने सभागृहाला ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत होते.

सातपुतेंचा आक्रमकपणा पाहून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी, 'तुम्ही माहिती देताय की वॉर्निंग देताय ?', असा सवाल केला. तसेच सातपुतेंना बोलण्यापासून रोखत खाली बसण्यास सांगून पुढील सदस्यांना बोलण्याची संधी दिली. त्यामुळे सभागृहात राम सातपुते यांना दुधाच्या प्रश्नावर आपली भूमिका सविस्तरपणे मांडता आली नसल्याचेही दिसून आले.

(Edited by Sunil Dhumal)

Ram Satpute, Rahul Narwekatr
Ashok Chavan: नांदेड जिल्हा सामान्य रुग्णालयाचा प्रश्न अधिवेशनात गाजला...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com