

Nagpur News : हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांकडून सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातच मागील पाच दिवसांपासून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील विद्यार्थी आंदोलन करत असल्याचे सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे. हाच मुद्यावरू काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील विद्यार्थ्यांनी लोटांगण आंदोलन केले. पोलिसांनी लाठीमार करून त्यांना पांगवले. या सर्व विद्यार्थ्यांना खोटी आश्वासन दिली. त्यांचा वापर करून विधानसभेच्या निवडणुकीत मत घेतले. सत्ता आल्यावर त्यांना बदडून काढून बक्षीस देण्यात आले, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी बेरोजगार युवकांना महायुती सरकारने गाजर दाखवले होते. सर्वांना प्रशिक्षण दिले जाईल स्टायफंड दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत जाहीर करताना या सरकारने केली होती. सोबतच शासकीय भरतीच्या वेळी पात्र उमेदवारांना सामावून घेतले जाईल असे सांगण्यात आले होते. निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाला युवा बेरोजगार बळी पडले. अनेकांनी प्रशिक्षण घेतले. मात्र सत्ता येताच सरकारला त्यांचा विसर पडला.
ते सर्व आता बेरोजगार झाले आहेत. नोकरी मागत आहे. पाच दिवसांपासून नागपूरमध्ये आंदोलन करीत आहे. त्याची दखलही सरकार घ्यायला तयार नाही. आंदोलन केले म्हणून बदडून काढणे ही कसली व्यवस्था असा आक्रमक सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार (vijay Wadettiwar) यांनी केला.
विधानसभेच्या लक्षवेधी प्रश्नात वडेट्टीवार म्हणाले, निवडणुकी आधी ही योजना आणली ,आता ती योजना बंद करून टाकली. या मुलांनी सरकारसाठी प्रचार केला, तुमच्यासाठी निवडणुकीत ते राबले त्याचे बक्षीस काय दिले तर काल आंदोलन केले म्हणून बेदम मारहाण केली,यातील काही मुलांना फ्रॅक्चर झाले आहेत, इतकी असंवेदनशील वृत्ती सरकारची आहे.
या मुलांच्या भविष्याचे काय? तत्कालीन मुख्यमंत्री म्हणाले होते त्यांना आम्ही सेवेत कायम करू त्याच काय झालं असा आक्रमक पवित्रा वडेट्टीवार यांनी विधानसभेत घेतला. यावर उत्तर देताना मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी या प्रशिक्षणार्थींना आम्ही नवीन योजनेत सामावून घेऊ, आम्ही याबाबत नवीन धोरण करणार आहोत असे आश्वासन सभागृहात दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.