Video Devendra Fadnavis : "माझ्या अटकेसाठी चारवेळा प्रयत्न, पण...", फडणवीसांचा खळबळजनक दावा

Devendra Fadnavis On Param Bir Singh : अनिल देशमुख आणि परमबीर सिंह यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. यातच परमबीर सिंह यांनी आरोपांवर देवेंद्र फडणवीस मोठा दावा केला आहे.
devendra fadnavis
devendra fadnavis sarkarnama
Published on
Updated on

प्रविण दरेकर, जयकुमार रावल आणि गिरीश महाजन यांच्यावर गुन्हे दाखल करून अडकविण्यासाठी दबाव आणण्यात येत होता, असा आरोप माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांवर केला आहे. परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

परमबीर सिंह जे बोललं ते खरं आहे. माझ्या अटकेसाठीही महाविकास आघाडीनं काही अधिकाऱ्यांना सुपारी दिली होती. त्यासाठी चारवेळा प्रयत्न झाले. पण, काहीच हाती लागलं नाही, असा मोठा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले, "माझ्यासह प्रविण दरेकर, गिरीश महाजन आणि अन्य काही नेत्यांना जेलमध्ये टाकण्यासाठी सुपारी दिली होती. पण, काही चांगल्या अधिकाऱ्यांनी खोट्या केसेस दाखल करण्यास नकार दिला. माझ्या अटकेसाठी चारवेळा प्रयत्न झाले. मात्र, यांना काही पुरावे मिळाले नाहीत. याच्या व्हिडिओचे पुरावे सीबीआयला दिले आहेत. आजही आमच्याकडे अनेक व्हिडिओचे पुरावे आहेत."

devendra fadnavis
Rajesh Tope Sing song for His Wife : राजेश टोपे जेव्हा गाणं गातात...

परमबीर सिंह यांचे आरोप काय?

"प्रविण दरेकर यांना अडकविण्यासाठी 'मातोश्री'वर, तर गिरीश महाजन यांना अडकविण्यासाठी 'सिल्व्हर ओक'वर बैठक झाली होती. गुन्हे दाखल करायला लावण्यासाठी अनिल देशमुख असले, तरी सूत्र त्यांच्यापाठीमागे वेगळेच लोक होते," असं परमबीर सिंह यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं.

devendra fadnavis
Ajit Pawar : "भुजबळ प्रचाराला जातील त्या मतदारसंघातील नेता पाडा", जरांगे-पाटलांचं विधान अन् अजितदादा म्हणाले...

"अनिल देशमुखांना पक्षाकडून 100 कोटींहून अधिक रूपयांचं टार्गेट दिलं होतं. अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि मुंबईतील अवैद्य धंद्यातून त्यांना हे पैसे गोळा करायचे होते. सलिल देशमुख, कुंदन शिंदे आणि त्यांच्यासह काही एजंट ललित हॉटेल येथे बसून डील करायचे," असा दावाही परमबीर सिंह यांनी केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com