BJP Vs MNS : 'मनसेमुळे महायुतीला काहीच फायदा नाही,आता त्यांना एकही जागा मिळणार नाही!'; भाजप आमदारानं ठणकावलं

BJP MLA Sanjeevreddy Bodkurwar News : आगामी निवडणुकांमध्ये वणी मतदारसंघ मनसेला दिला, तर आम्ही त्याचा प्रचंड विरोध करणार...
Devendra Fadnavis, Raj Thackeray
Devendra Fadnavis, Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Vidarbha News : लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता.एवढंच नाही तर राज ठाकरेंनी महायुतीच्या उमेदवारांसाठी सभाही घेतल्या होत्या.पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत एका स्टेजवरही आले होते.पण आता भाजप- मनसे खटके उडण्याची शक्यता आहे.

भाजप आमदाराने चक्क मनसेवर गंभीर आरोप केले आहेत. मनसे नेते राजू उंबरकर यांचा विदर्भात महायुतीला एका रुपयाचाही फायदा झाला नसल्याचा दावा करत या ठिकाणी एकही मतदारसंघ मनसेला मिळणार नाही, असा पवित्रा वणी मतदारसंघाचे भाजपचे आमदार संजीवरेड्डी बोडकुरवार यांनी घेतला आहे. त्यामुळे आता भाजप-मनसेमध्ये नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) बिनशर्त पाठिंब्यानंतर मनसे नेते राजू उंबरकर यांनी विदर्भात मनसे पूर्ण ताकदिनीशी महायुतीच्या उमेदवाराला विजयी करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता.तसेच त्यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारात मनसेने पुढाकार घेतला होता.

तसेच उंबरकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजय संकल्प सभेलाही उपस्थित होते असे असतानाही भाजप आमदार संजीवरेड्डी बोडकुरवार यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे लोकसभेच्या निकालानंतर आधीच बॅकफूटवर गेलेल्या महायुतीसमोर नवं संकट उभं ठाकलं आहे.

Devendra Fadnavis, Raj Thackeray
Amol Mitkari Vs Bajrang Sonwane : 'बाप्पा, दादांनी मला ऑपरेटर बनवलं तर मी..' ; मिटकरींनी सोनवणेंना पुन्हा डिवचलं!

बोडकुरवार म्हणाले,आगामी निवडणुकांमध्ये वणी मतदारसंघ मनसेला दिला, तर आम्ही त्याचा प्रचंड विरोध करणार असल्याचेही ते म्हणाले. वणीमध्ये मनसेची मोठी ताकद असून चंद्रपुरातही मनसेने चांगलंच जाळं विस्तारलं आहे,त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला बळ मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, या मतदारसंघात मनसेचा(MNS) कुठलाही फायदा महायुतीला झाला नाही असा दावा करुन त्यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे.

भाजपकडून विधानसभा निवडणुकीत उमेदवारी जाहीर करताना प्रत्येक उमेदवारांचं अवलोकन आणि सर्व्हे होणार आहे. गेल्या पाच वर्षांत केलेली कामं आणि जनमताचा कौल ठरवूनच वरिष्ठ उमेदवारी देणार असल्याचे विधानही संजीव रेड्डी बोडकुरवार यांनी केली आहे.

Devendra Fadnavis, Raj Thackeray
Sharad Pawar Ready for Vidhan Sabha : शरद पवारांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग! ; म्हणाले, 'काही झालं तरी आता महाराष्ट्रातील..'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com