Sharad Pawar Ready for Vidhan Sabha : शरद पवारांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग! ; म्हणाले, 'काही झालं तरी आता महाराष्ट्रातील..'

Sharad Pawar Indapur Farmers Meeting : इंदापूरातील दुष्काळी गावांची केली पाहणी; आपल्याला चार -सहा महिन्यामध्ये सरकार बदलायचं आहे, असंही म्हणाले आहेत.
Sharad Pawar Indapur Farmers Meeting
Sharad Pawar Indapur Farmers MeetingSarkarnama

Sharad Pawar on Maharashtra Goverment : लोकसभा निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महायुतीला चांगलाच फटका बसला आहे. तर महाविकास आघाडीला यश मिळालं आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाची कामगिरीही जबरदस्त दिसून आली आहे. त्यामुळे पक्षात सध्या चैतन्याचे वातावरण आहे. तर पक्ष प्रमुख शरद पवार यांनीही आगामी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकल्याचं दिसत आहे.

'काही झालं तरी यावेळेला महाराष्ट्रातील सरकार हातामध्ये घ्यायाचे आहे. सरकार बदल्याशिवाय आपल्याला पाहिजे तशी धोरणे-निर्णय घेता येत नाही.' असं सांगून राज्य सरकार बदलण्याचा निर्धार करुन शरद पवारांनी विधानसभेचे रणशिंग इंदापूर तालुक्यातुन फुंकले आहे.

Sharad Pawar Indapur Farmers Meeting
Sharad Pawar : '...पण मतांची कमतरता पडू दिली नाही', शरद पवारांकडून बळीराजाचे कौतुक

शरद पवार(Sharad Pawar) यांनी बुधवार (ता.12) रोजी इंदापूर तालुक्यातील निरवांगी, खोरोची व बोराटवाडी परिसरातील नीरा नदी काठच्या दुष्काळी पट्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी पवार यांच्यापुढे अडचणींचा पाढा वाचला.

म्हणाले, 'सध्या दुधाला दर मिळत नाही, दुधाचे अनुदान खात्यावर जमा होत नाही, नीरा नदीमधील कोल्हापूरी पद्धतीच्या बंधाऱ्यांची दुरावस्था झाली आहे, बंधाऱ्यात साठवलेल्या पाण्याची गळती होते, नीरा डाव्या कालव्याचे पाणी मिळत नाही, कालव्यातुन मोठ्या प्रमाणात पाण्याची चोरी होते आणि गावामध्ये पिण्याचे पाणी नाही, जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला असल्याचे सांगितले.

यावेळी पवार यांनी सांगितले की, 'आज ज्यांच्या हातामध्ये सरकार आहे, त्यांना आपण कामे करण्याची विनंती करु. सत्तेचा वापर ज्यांनी (शेतकऱ्यांनी) सत्ता दिली त्यांच्यासाठी करायचा असतो. मात्र राज्य सरकार किती लक्ष घालेल हे सांगू शकत नाही. आपल्याला चार -सहा महिन्यामध्ये सरकार बदलायचं आहे.'

Sharad Pawar Indapur Farmers Meeting
Sharad Pawar On Narendra Modi : सत्ता डोक्यात घुसली की मोदींची गॅरंटी चालत नाही,पवारांची मोदींवर टीका !

तसेच, 'सरकार बदल्याशिवाय आपल्‍या पाहिजे तशी धोरणे आखून निर्णय घेता येणार नाहीत. सहा महिन्यामध्ये धोरणे ठरविण्याचे अधिकार तुमच्या हातामध्ये द्यायाचा असून, आपल्याला विधानसभा जिंकायची आहे आणि राज्य हातामध्ये घ्यायाचे आहे. यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे.' असे सांगितले.

या दौऱ्यामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे,इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष अॅड तेजसिंह पाटील,कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, अशोक घोगरे, सागर मिसाळ, निमसाखर मधील शेतकरी नंदकुमार रणवरे, निरवांगीमधील दशरथ पोळ यांच्यासह परीरातील शेतकरी उपस्थित होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com