Mahayuti : राष्ट्रवादीची चौथी यादी; 'मोर्शी'त मैत्रीपूर्ण लढत? भाजपनंतर अजितदादांनीही दिला 'लाडका' उमेदवार

Morshi Assembly Constituency: मोर्शी विधानसभा मतदारसंघातून देवेंद्र भुयार अपक्ष निवडून आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ते जवळचे मानले जातात. त्यामुळे महायुतीमध्ये तिकीट आपल्यालाच भेटणार अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरणार की काय अशी चर्चा जोर धरु लागली होती.
Ajit Pawar, Devendra Fadnavis
Ajit Pawar, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : मोर्शी विधानसभा मतदारसंघात अजितदादांच्या जवळचा आमदार असतानाही भाजपने ही जागा आपल्याकडे खेचून आणली. उमेश यावलकर यांना उमेदवारीसुद्धा जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून संधी मिळणार नसल्याची चाहूल लागताच देवेंद्र भुयारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 'तुतारी'साठी प्रयत्न जोरदार केले होते. असून अमरावती जिल्ह्यातील शरद पवार यांचे विश्वासू हर्षवर्धन देशमुख यांच्याकडे त्यांनी गळ घातली असल्याचेही चर्चा होती. पण आता भाजपकडून उमेदवार दिला असतानाच सोमवारी (ता.28) अजित पवारांच्या पक्षाकडून देवेंद्र भुयार यांना मोर्शी मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली आहे.

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत दोन जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.यात मोर्शीतून देवेंद्र भुयार आणि भोरमधून शंकर मांडेकर यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे.

मोर्शी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या 2019 निवडणुकीत मोर्शी मतदारसंघातून देवेंद्र भुयार अपक्ष निवडून आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ते जवळचे मानले जातात. त्यामुळे महायुतीमध्ये तिकीट आपल्यालाच भेटणार अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरते की काय अशी चर्चा जोर धरु लागली होती. राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) अमरावतीचे तिकीट देण्यात आले आहे.

Ajit Pawar, Devendra Fadnavis
Shivsena Third List : मोठी बातमी! शिवसेनेची तिसरी यादी जाहीर; मुंबादेवी, संगमनेर यांसह 15 'हाय व्होल्टेज' लढतींचे शिलेदार ठरले

सुलभा खोडके या राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत. त्यामुळे मोर्शीवर भाजपने दावा केला आहे. वाटाघाटीत मोर्शी आपल्याकडे घेण्यात भाजपला यश आले आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादीला जाणार असल्याने चार दिवसांपूर्वी उमेश यावलकर यांनी भाजपला जय महाराष्ट्र केला होता. मात्र दोनच दिवसात ते पुन्हा भाजपमध्ये परतले.

भाजपने त्यांना दिलेला शब्द पाळला. त्यांचे नाव यादीत आले आहे. उद्या मंगळवारी ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मोर्शीचे माजी आमदार आणि राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी त्यांच्या उमेदवारीसाठी किल्ला लढवल्याचे समजते. त्यांच्या माध्यमातून बोंडे यांना पराभवाचा बदला घ्यायचा आहे.

Ajit Pawar, Devendra Fadnavis
Congress fifth candidate list : काँग्रेसने जाहीर केली पाचवी उमेदवार यादी; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात उमेदवार बदलला!

देवेंद्र भुयार यांनी २०१९च्या निवडणुकीत बोंडे यांना पराभूत केले होते. यावलकर यांना उमेदवारी देऊन भाजपने जातीय सलोखा साधला आहे. त्यांना आता भाजपचे कार्यकर्ते कशी मदत करतात यावरच त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.

दुसरीकडे देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांना अमरावती जिल्ह्यात राजकीय दबदबा असलेले हर्षवर्धन देशमुख यांनी मतद केली होती. मात्र ते शरद पवार यांना सोडून अजित पवार यांच्याकडे गेल्याने देशमुखांनी त्यांच्याशी संबध तोडले होते. भुयार यांचा आपल्याशी कुठलाही संबंध नाही असे पत्रकही त्यांनी जारी केले होते. आता भुयार यांना पुन्हा देशमुखांकडे मदतीची मागणी केली आहे.

शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप येथे उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे भुयार यांच्या आशा कायम आहे. भुयारी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना अजित पवार यांनी एबी फॉर्म दिल्याच्याही चर्चा आहेत. त्यांचे समर्थक सोशल मीडियावर तसा दावा करत आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप त्यांचे नाव अधिकृतपणे जाहीर केलेले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com