Congress fifth candidate list : काँग्रेसने जाहीर केली पाचवी उमेदवार यादी; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात उमेदवार बदलला!

Congress Vidhansabha Election candidate list : जाणून घ्या, या यादीत किती जणांचा आहे समावेश आणि कोल्हापूर उत्तर मतदारसंघात कोणाला दिली आहे आता उमेदवारी?
Congress
Congress Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Congress Politics News : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आज पाचवी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये चार उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. तर , कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील उमेदवार काँग्रेसने बदलेला आहे.

या आधी कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसने(Congress) राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर केली होती, मात्र आता त्यांच्या जागी मधुरिमाराजे मालोजीराजे छत्रपती यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

Congress
Nitin Raut vs BSP : ...म्हणून बहुजन समाज पार्टीमुळे वाढलं नितीन राऊतांचं टेन्शन?

याशिवाय पाचव्या यादीत अकोला पश्चिम मतदासंघातून साजीद खान मन्नन खान, कोलाबा मधून हिरा देवसी आणि सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून चेतन नरोटे यांना उमेदवारी जाहीर केली गेली आहे.

Congress
Nilanga Assembly Constituency: निलंगेकरांनी अपक्ष अर्ज भरला, अमित देशमुख मनधरणी करणार!

दरम्यान, विधानसभेच्या निलंगा मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज झालेल्या प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर यांनी अखरे बंडाचे निशाण फडकावलेच. आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत त्यांनी विरोधक तसेच स्वपक्षाचे अधिकृत उमेदवार अभय सोळुंके यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत.

(Editedc by - Mayur Ratnparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories