Dilipkumar Sananda Vs Fundkar : महायुतीत प्रवेशानंतरही आकाश फुंडकरांच्या विरोधात सानंदा न्यायालयात!

Dilipkumar Sananda News - मै काँग्रेस का परिंदा हू.. असे सांगणाऱ्या सानंदा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे.
Dilipkumar Sananda Vs Akash  Fundkar
Dilipkumar Sananda Vs Akash Fundkarsarkarnama
Published on
Updated on

Dilipkumar Sananda files court case against Akash Fundkar - खामगाव विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या याचिकेवर न्यायालयाने कामगार मंत्री आकाश फुंडकर यांना नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे चार दिवसांपूर्वीच सानंदा हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसावादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून महायुतीत सहभागी झाले आहेत. हे बघता आता सानंदा याचिका मागे घेतात की कायम ठेवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांचा पराभव झाला आहे. यात विदर्भातील नेत्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या निवडणुकीत काही तरी गडबड झाल्याची शंका सर्वांना आहे. त्यामुळे सुमारे दहा ते बारा काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

काही दिवस आधीच काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी महाराष्ट्राची विधानसभा भाजपने चोरली, अधिकाऱ्यांच्या मदतीने मॅचफिक्सिंग केल्याचा आरोप केला होता. काँग्रेसच्या आदेशानाचे सर्वच उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आव्हान दिले आहे. यात दिलीपकुमार सानंदा यांचाही समावेश आहे.

सानंदा हे यापूर्वी खामगाव विधानसभा मतदारसंघातून चारवेळा निवडून आले होते. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी त्यांची जवळीक होती. मात्र मै काँग्रेस का परिंदा हू असे सांगणाऱ्या सानंदा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. महायुतीत नाराजी राहू नये याकरिता त्यांनी भाजपसह महायुतीमधील सर्वच नेत्यांना पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाचे वैयक्तिक निमंत्रणही दिले होते.

बुलढाणा जिल्ह्यातील फुंडकर यांच्यासह चिखली मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार श्वेता महाले यांच्याही विरोधात माजी आमदार राहूल बोंद्रे यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उत्तर देण्यासाठी दोघांना न्यायालयाने चार आठवड्यांची मुदत दिली आहे. सानंदा यांनी फुंडकर यांची निवड अवैध ठरवून त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी आहे.

Dilipkumar Sananda Vs Akash  Fundkar
Ram Shinde Vs Rohit Pawar : कर्जत नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत राडा; राम शिंदेंच्या समर्थकांनी रोहित पवारांच्या प्रतिनिधींना भर सभेत धुतले!

या निवडणूकीत ईव्हीएम संबंधीच्या नियमांची पायामल्ली करण्यात आली. तसेच मतदान केंद्रातील व्हीडीओ फुटेज देण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे या निवडणुकीत सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आल्याने फुंडकरांचा विजय अवैध ठरवून त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी सानंदा यांनी याचिकेद्वारे केली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com