Gondia : उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक लोकेश ऊर्फ कल्लू यादव यांच्यावर गोळीबार

Lokesh Yadav : कंबरेला लागली गोळी; प्रथमोपचारानंतर उपचारासाठी नागपूरला हलविले.
Lokesh Kallu Yadav Gondia.
Lokesh Kallu Yadav Gondia.Sarkarnama
Published on
Updated on

Gun Firing : गोंदिया नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते लोकेश कल्लू यादव यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. गुरुवारी (ता. 11) सकाळी तीन अनोळखी व्यक्तींनी हेमू कॉलनीजवळ यादव यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात ते जखमी झाले.

हल्ल्यात यादव यांच्या कंबरेला गोळी लागल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी झाल्याने त्यांच्यावर केटीएस रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना तातडीने नागपूर येथील इस्पितळात हलविण्यात आलेत. लोकेश कल्लू यादव हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष पंकज यादव यांचे भाऊ आहेत. गोळीबाराच्या या घटनेमुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या गोळीबार प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

Lokesh Kallu Yadav Gondia.
Gondia : रोखण्याऐवजी बापानेच गुन्ह्याकडे लोटले; वादातून मुलांच्या मित्राला कायमचे संपविले

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक लोकेश (कल्लू) यादव (वय 44) हे आपल्या राहत्या घरातून गुरुवारी (ता. 11) सकाळी 11 वाजताच्या सुमारास मोटारसायकलने बाहेर जात होते. त्यांच्याच घराजवळील हेमू कॉलनी चौकात अचानक त्यांच्यावर तीन अनोळखी मोटारसायकलस्वारांनी हल्ला केला. काही कळण्यापूर्वीच या तरुणांनी यादव यांच्यावर गोळ्या झाडल्या.

गोळीबारानंतर आरोपी पसार झालेत. गोळीबारात लोकेश यादव यांच्या कमरेला गोळी लागली. परिसरात उपस्थित त्यांच्या मित्रांनी यादव यांना जखमी अवस्थेत गोंदियातील कुंवर तिलक सिंग जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील वैद्यकिय महाविद्यालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यायानंतर यादव यांना तातडीने नागपूरला नेण्यात आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गोळीबाराच्या घटनेची माहिती गोंदिया शहरात वाऱ्यासारखी पसरली. लोकांनी घटनास्थळी व नंतर केटीएस जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली. त्यामुळे घटनास्थळ व रुग्णालयात चांगलीच गर्दी झाली होती. काही काळ संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ही बाब लक्षात घेत शहरातील सराफा लाइन भगाातील दुकाने बंद करण्यात आलीत. पोलिसांनी लगेच संवेदनशील क्षेत्रातील बंदोबस्तात वाढ केली. गोळीबार झालेल्या ठिकाणी व रुग्णालयात पोलिस तैनात करण्यात आलेत. सध्या शहरातील वातावरण शांत असून परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलिसांकडून घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली जात आहे. गोळीबार करणारे आरोपी लवकरच पकडले जातील. त्यासाठी पोलिसांची चार पथके वेगवेगळ्या दिशेने रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक निखिल पिंगले यांनी ‘सरकारनामा’ला दिली. गोळीबारामागील कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Lokesh Kallu Yadav Gondia.
Gondia : धुळे एसआरपीएफ पोलिसाविरुद्ध सालेकसात गुन्हा दाखल; बंदूक घेत दिली...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com