Manish Sisodia : विदर्भातही ‘आप’चे कार्यकर्ते आक्रमक, भाजप कार्यालयासमोर घोषणाबाजी !

Akola : नेत्यांना यांना जाणीवपूर्वक खोटे आरोप लावून अटक केली जात आहे.
Akola Aam Aadmi Party
Akola Aam Aadmi PartySarkarnama

Aam Aadmi Party News : जगात शिक्षण काय असते आणि गरिबांना शासकीय शाळेतून उच्च दर्जाचे शिक्षण कसे देता, येते याचे मॉडेल दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी मांडले. त्यामुळे जगात आम आदमी पार्टीची प्रतिमा उंचावली. तर केंद्राच्या सत्तेत सहभागी असलेल्या भाजपची देशासह जगात नाचक्की झाली आहे.

त्यामुळे भाजप प्रणीत केंद्र सरकारने ईडी सीबीआयचा गैरवापर करत देशातील भाजपच्या विरोधात असलेली राज्य सरकारे व त्यांच्या नेत्यांना यांना जाणीवपूर्वक खोटे आरोप लावून अटक केली जात आहे. दिल्ली राज्याचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही अटक करण्यात आली आहे. या अटकेच्या निषेधार्थ आज विदर्भाच्या नागपूर, अकोला आणि काही जिल्ह्यांत भाजप कार्यालयासमोर आम आदमी पार्टीकडून निदर्शने करण्यात आली.

आंदोलनात पश्चिम विदर्भ संयोजक तथा राज्य कार्यकारिणी सदस्य शेख अन्सार, जिल्हा संयोजक अरविंद कांबळे, जिल्हा प्रवक्ता विजय चक्रे, रत्नदीप खरात, श्रावण रंगारी, डॉ सहदेव वाडेकर, गजानन मेश्राम, तालुका अध्यक्ष विजय भटकर, दळवी, काझी लायकअली, गजानन गणवीर, अनुराग झुणझुणवाला, कैलास प्रांजळे, सागर प्रांजळे, ऋषभ अत्तर कर, संदीप जोशी, राउफ, सुगदेव गोपणारायन, सचिन तेलगोटे, अशोक बनसोड, सुखदेव दंदी, विजय निराळे, खालीक भाई, महेश यादव, अतिक भाई, संतोष वक्ते, श्रीकृष्ण घोरपडे, सुधाकर अंभोरे, मुलींद भाई, प्रमोद इंगळे सहभागी झाले होते.

दिल्ली सरकारच्या नवीन अबकारी धोरणात झालेल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांना सीबीआयने काल रविवारी रात्री उशिरा अटक केली. आज दुपारी त्यांना राऊस अॅव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्यांना पाच दिवसांची म्हणजे ४ मार्चपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यावेळी त्यांनी काही महिने तुरुंगात काढावे लागतील, अशी भीतीही व्यक्त केली होती. मनीष सिसोदिया यांच्या अटकेनंतर 'आप'चे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आक्रमक झाले आहेत.

Akola Aam Aadmi Party
Aam Aadmi Party : केजरीवालांचे लक्ष आता महाराष्ट्रातील या जिल्ह्यांवर ; सगळ्या निवडणूका लढवणार..

मनीष सिसोदियांना (Manish Sisodia) जाणूनबुजून अटक करण्यात आल्याचं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. मुंबईतील (Mumbai) आंदोलनादरम्यान काही 'आप'च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दिल्ली, मुंबई, पुण्यानंतर विदर्भातही (Vidarbha) 'आप'चे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अकोल्यात (Akola) आपच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या (BJP) कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यामुळे आता राजकारण तापण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com