Shivsena - BJP : ...म्हणून साताऱ्यात शिवसेना- भाजपमध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चांना आले उधाण!

Patan News : जाणून घ्या, पाटण मतदारसंघात नेमकं असं काय घडलं?
shinde fadanvis
shinde fadanvis sarkarnama

Satara District Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातील पाटण मतदार संघात महायुती सरकारमधील भाजपाकडून कोटींचा निधी मंजूर झाला आहे. मात्र या निधीच्या सोशल मीडियावरील जाहिरातीवरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात दुरावा असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

उत्पादन शुल्क मंत्री आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदार संघात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा करून निधी मिळाला आहे. त्यामुळे या निधीच्या जाहीरातीवर केवळ भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना स्थान देण्यात आले असून मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांना डावलण्यात आल्याच्या बोललं जात आहे.  

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

shinde fadanvis
Karad Politics : कराड उत्तर मतदारसंघात सत्ता राष्ट्रवादीची अन् भाजपने आणला पाच कोटींचा निधी!

पाटण तालुक्यातील तारळे जिल्हा परिषद मतदारसंघात आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आणि भाजपा प्रदेश सचिव भरत पाटील यांच्या माध्यमातून शासनाकडून तारळे देटके वस्ती सभामंडप 10 लाख, केळेवाडी अंतर्गत काँक्रीटीकरणं 10 लाख, कोंजवडे अंतर्गत काँक्रीटीकरण 10 लाख, बांबवडे येथे व्यायाम शाळा 10 लाख, दूटाळवाडी येथे अंतर्गत काँक्रीटीकरण 10 लाख असा 50 लाख रुपयांचा विकासनिधी मंजूर झाल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ लाहोटी यांनी दिली आहे.

सदर कामे मंजूर केल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचे फोटो असलेली सोशल मीडियावर जाहिरात व्हायरल होत आहे. मात्र या जाहिरातीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डावलण्यात आले असून पालकमंत्री आणि पाटण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शंभूराज देसाई यांनाही स्थान दिले गेले नाही. त्यामुळे आता पाटण तालुक्यात शिंदे गट (शिवसेना) आणि भाजप यांच्यातील दुरावा निर्माण झाल्याचे बोलेले जात आहे.

shinde fadanvis
Devendra Fadnavis : बीडच्या 18 लाख शेतकऱ्यांना 'पीक विमा अग्रीम' दिल्याचा फडणवीसांचा दावा, मात्र वस्तुस्थिती भलतीच!

नरेंद्र पाटलांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला  -

आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष नरेंद्र आंण्णासाहेब पाटील यांनी महामंडळाला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल फेसबुक लाईव्ह केले होते. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांना खोचक टोला लगावला होता. यावरून ते मुख्यमंत्री याच्यावर नाराज असल्याचे दिसून आले होते, आता पुन्हा एकदा मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यात आणि पालकमंत्र्याच्या मतदार संघात भाजप स्वतंत्रपणे आपलं काम करत असल्याचे या जाहिरातीवरून दिसत आहे.

नरेंद्र पाटील फेसबुक लाईव्ह मध्ये म्हणाले होते की, ''मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्याचे असून त्यांच्या प्रायोरिटी वेगवेगळ्या असल्याने मला 10- 15 दिवस भेटण्यासाठी उजाडतात. त्यांच्या प्रायोरिटीमध्ये आण्णासाहेब पाटील महामंडळ दिसत नाही. तसेच यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुकही केले आणि मुख्यमंत्र्यांना व्यस्त कामामुळे येता आले नाही. हरकत नाही, आम्ही छोटी माणसे आहोत." असंही पाटील म्हणाले होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com