OBC Vs Maratha : मराठा समाज मुंबईच्या वेशीवर पोहोचताच ओबीसी समाजही मैदानात; नागपूरमधून होणार एल्गार

OBC announce hunger strike in Nagpur : मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली असून त्याला ओबीसी नेत्यांकडून विरोध होताना दिसत आहे. यामुळे आरक्षणावरून राज्यातील दोन समाज आमने-सामने येताना दिसत आहे.
Maratha REservation, OBC Reservation
Maratha REservation, OBC ReservationSarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने मुंबईकडे कूच करत एल्गार पुकारला आहे.

  2. ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणाला तीव्र विरोध दर्शवून नागपूरमध्ये 30 ऑगस्टला साखळी उपोषण जाहीर केले आहे.

  3. या दोन आंदोलनांमुळे महाराष्ट्रातील वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Nagpur News : मराठा समाज आरक्षणासाठी पुन्हा एकदा आक्रमक झाला असून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एल्गार पुकारला आहे. ते मुंबईकडे निघाले असून त्यांच्या नेतृत्वात मराठा एकवटल्याचं पहायला मिळत आहे. अशातच त्यांना ओबीसी नेत्यांकडून विरोध होताना दिसत आहे. तर ओबीसी नेत्यांनी नागपुरात 30 ऑगस्टला साखळी उपोषणाची घोषणा केली आहे. यामुळे राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे.

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं ही मराठा समाजाची प्रमुख मागणी असून त्यासाठीच जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. ते मुंबईतील आझाद मैदानावर शुक्रवारी (ता.29) आंदोलनावर बसणार आहेत. त्यासाठी त्यांना परवानगीही मिळाली आहे.

Maratha REservation, OBC Reservation
Maratha vs OBC reservation : मनोज जरांगे-लक्ष्मण हाकेंचा बैठकींचा धडाका; कुणाच्या बैठकीला किती गर्दी? नियोजन जुळलं की, फिस्कटलं?

एकीकडे जरांगे पाटील मराठा समाजासह मुंबईच्या दिशेनं निघाले असतानाच आता राष्ट्रीय ओबीसी महासंघाने देखील आरक्षणावरून दंड थोपाटले आहेत. संघाने असे दंड थोपाटल्याने राज्यातील वातावरण आता तंग झाले असून मराठा समाजाला विरोधाची भूमिका ओबीसी समाज घेताना दिसत असल्याचे चित्र तयार झाले आहे.

यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी राज्यभरातील महत्वाचे पदाधिकारी यांची ऑनलाईन आणि ऑफलाईन बैठक घेतली. त्यांनी, मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विरोध असल्याचे स्पष्ट केले.

तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जनजागृती मोहिम राबवली जाणार असून 30 ऑगस्ट 2025 रोजी नागपूरातील संविधान चौकात साखळी उपोषण केले जाईल अशी घोषणा केली आहे. यावेळी नागपूरसह इतर जिल्ह्यांमध्ये देखील स्थानिक पदाधिकारी उपोषण करतील. तर आमच्या मागण्या घेऊन आम्ही देखील 15 दिवसांत मुंबईकडे कूच करू असाही इशारा महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी दिला आहे.

Maratha REservation, OBC Reservation
Maratha Vs OBC controversy : समीर भुजबळांच्या इशाऱ्याने मराठा विरुद्ध ओबीसी वाद पुन्हा पेटणार?

FAQs :

प्र.१. मनोज जरांगे पाटील यांनी कोणता मोर्चा काढला आहे?
उ. त्यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे एल्गार मोर्चा काढला आहे.

प्र.२. ओबीसी समाजाने काय भूमिका घेतली आहे?
उ. ओबीसी समाजाने मराठा आरक्षणाला तीव्र विरोध दर्शवून साखळी उपोषणाची घोषणा केली आहे.

प्र.३. ओबीसींचं उपोषण कधी होणार आहे?
उ. 30 ऑगस्ट रोजी नागपूरच्या संविधान चौकात साखळी उपोषण होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com