Maratha Andolan Death : मराठा आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी धक्का; अंतरवालीकडे निघालेल्या आंदोलकाचा मृत्यू (Video)

Maratha protester Sugriv Shinde dies of a heart attack while heading to Manoj Jarange Patil's agitation at Antarwali Sarati : बीडच्या केज तालुक्यातील सुग्रीव बापू शिंदे यांचा गेवराईजवळ मृत्यू; मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त वाढला
Sugriv Shinde
Sugriv ShindeSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आजपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी मराठा समाजाला धक्का देणारी घटना समोर आली आहे.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील नांदूर घाट येथील आंदोलक सुग्रीव बापू शिंदे यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी सुग्रीव शिंदे हे आपल्या सहकाऱ्यांसह अंतरवाली सराटीकडे निघाले होते. त्यांचे वाहन गेवराईजवळ आले असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा धक्का आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाची भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षणातील 58 लाख नोंदींच्या आधारे मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, जात पडताळणीमध्ये नाकारण्यात आलेली प्रमाणपत्रेही द्यावीत, यासह विविध 13 मागण्या त्यांनी सरकारसमोर ठेवल्या आहेत.

Sugriv Shinde
BJP leader attack : PI दराडेंचा दणका; भाजप नेत्यावरील हल्लाप्रकरणात 16 अटकेत, 14 जणांना पोलिस कोठडी

आंतरवाली सराटीत उपोषण सुरू झाल्यानंतर मराठा समाजातील आंदोलकांची गर्दी वाढू लागली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा पोलिस प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना वाढवल्या असून पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. बीड जिल्ह्यातही पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Sugriv Shinde
Police Officer Death : दोन महिन्यांपूर्वीच हिंगोलीत बदली; फौजदाराची धावत्या रेल्वेसमोर उडी, पोलिस दलात खळबळ

जरांगे पाटील यांच्याशी चर्चा सुरूच...

मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन करू नये, यासाठी राज्य सरकारकडून चर्चा सुरू आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई तसेच आमदार प्रसाद लाड हे जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत आहेत.

मंत्री उदय सामंत यांची भूमिका

मंत्री उदय सामंत यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करताना मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनांमध्ये कोणतीही कपात होणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही, अशी सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

जरांगे पाटील सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील यांनी सत्ताधारी भाजपच्या नेत्यांवरही जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर त्यांनी आंदोलनापूर्वी निशाणा साधला होता. आता आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी सुग्रीव शिंदे यांच्या मृत्यूची घटना घडल्याने मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वातावरण अधिक संवेदनशील झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com