Manoj Jarange Patil News : सिंदखेड राजामध्ये राजमाता जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होत जरांगेंनी आंदोलनात भरला हुंकार

Maratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.
Manoj Jarange Patil News
Manoj Jarange Patil NewsSarkarnama

Buldana News : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान, त्यांनी मंगळवारी बुलडाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे थेट दिली. यावेळी राजमाता मॉं जिजाऊ यांच्या राजवाड्यामध्ये जाऊन त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले. राजमाता सरकारला सद्बुद्धी देवो वर्षानुवर्ष चाललेला अन्याय हा बंद झाला पाहिजे, असा इशारा त्यांनी सिंदखेड राजा येथून दिली.

शिवाजीनगर येथील टी पॉइंट ते लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यापर्यंत भव्य वाहन रॅली काढण्यात आली. यामध्ये शेकडो समाज बांधव सहभागी झाले होते. राजवाड्यामध्ये प्रवेश करतात महिलांनी औक्षण करून फटाक्याच्या आताषबाजीने जरांगे (Manoj Jarange Patil) यांचे स्वागत केले. यावेळी जरांगे पाटील म्हणाले, राजमाता मॉं साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे, त्यांच्या चरणी नतमस्तक झालो आहे. याच ठिकाणाहून जगाला स्वराज्य मिळाले, या ठिकाणावरून प्रेरणा मिळाली बळ मिळे, असे ते म्हणाले.

Manoj Jarange Patil News
Ajit Pawar News: मोठी बातमी ! अजित पवारांचा पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा

राजमाता माँ जिजाऊ यांचा आशीर्वाद मिळाल्यामुळे आता आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. आरक्षण हा कुणाचा विषय नाही आरक्षण ही मक्तेदारी नाही ही सुविधा आहे. जो समाज मागासलेला आहे. ज्या ज्या समाजाला व्यवसायाने आरक्षण दिले आहे. त्यामध्ये मराठासमाज आहे, सरकार म्हणून तुमची काही जबाबदारी आहे, पालकत्व तुमच्याकडे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

सरकार कोणाचेही असो आंदोलनकर्ते या नात्याने विश्वास ठेवावाच लागतो, सरकारला आरक्षण द्यायचे नसते तर त्यांनी आमच्याकडून वेळ घेतलाच नसता. पाच हजार पानांचा अहवाल शासनाला दिला आहे. महाराष्ट्रातल्या सरसकट मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे, शासन कायदा पारित करून आरक्षण देणार असल्याची आशा आम्हाला आहे.

Manoj Jarange Patil News
Rajasthan Politics: वसुंधरा राजेंना भाजपचा दणका; पहिल्या यादीत तर पत्ता कट...

विदर्भाच्या नातलगांच्या भूमीत आलो आहे. ही पवित्र भूमी आमच्या पाठीशी आहे कारण आमच्या लेकरा बाळांचे कल्याण व्हावे त्यांची सुद्धा इच्छा आहे. मातृतीर्थच्या भूमीने अन्यायाविरुद्ध लढा दिला आहे. विदर्भातील आमचे बांधव आमच्या पाठीशी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी उभे, असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बी. बी महामुने, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कुमार मालवी, प्रदीप पाटील ठाणेदार ब्रह्मदेव शेळके, ठाणेदार दत्तात्रय वाघमारे, ठाणेदार विकास पाटील, ठाणेदार सदानंद सोनकांबळे यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. या वेळी विविध राजकीय पक्षाचे नेते व पदाधिकारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ओबीसी बांधव खांद्याला खांदा लावून आंदोलनात उभा राहणार

ग्रामीण भागात ओबीसी बांधव व मराठा समाज हे एकत्र आहेत. हजारो ओबीसी बांधवांचे पाठिंब्याचे निवेदन आमच्याकडे आले आहेत. त्यांची इच्छा आहे गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळावे, हीच अपेक्षा ओबीसी (OBC) बांधवांची आहे. त्यामुळे ओबीसी बांधव खांद्याला खांदा लावून आंदोलनात उभा राहणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

Edited by : Amol Jaybhaye

Manoj Jarange Patil News
Indurikar Maharaj News : इंदुरीकर महाराजांच्या घरच्या व्हरांड्यात 'तो' दबक्या पावलांनी आला, अन्...!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com