Chandrakant Patil: 'जरांगे पाटलांना कायम टिकणारे आरक्षण हवं की...'; चंद्रकांत पाटलांचा सवाल

Chandrakant Patil On Manoj Jarange Patil and Maratha Reservation : "मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही राज्य सरकारचीही भावना..."
Chandrakant Patil and Manoj Jarange Patil
Chandrakant Patil and Manoj Jarange Patil Sarkarnama
Published on
Updated on

Amravati News: गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे. मराठा समाजाने आरक्षणाची मागणी करत विविध ठिकाणी सभा, आंदोलने पुकारली आहेत, तर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 तारखेचा अल्टिमेटम दिलेला आहे. आता उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली आहे.

"मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही राज्य सरकारचीही भावना आहे. मात्र, मनोज जरांगे पाटलांना कायम टिकणारे आरक्षण हवं आहे, की कोर्ट कचेऱ्यांच्या फेऱ्यात आधीसारखे फसणारे आरक्षण हवं आहे, हे त्यांनी ठरवावं", असे चंद्रकांत पाटील अमरावतीत बोलताना म्हणाले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chandrakant Patil and Manoj Jarange Patil
Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला; मंत्री रावसाहेब दानवे, अतुल सावेंच्या कार्यक्रमात गोंधळ

"मुख्‍यमंत्री आणि दोन्‍ही उपमुख्‍यमंत्री मराठा आरक्षणाच्‍या मुद्द्यावर २४ ऑक्‍टोबरच्‍या आधी काय करता येईल, याबाबत विचार करत आहेत. उपमुख्‍यमंत्री फडणवीसांनीही प्रमुख नेत्‍यांची बैठक घेतली आहे. पण मनोज जरांगे पाटलांनी आरक्षणासाठी घाई करू नये, कारण मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून न्यायालयाचा दरवाजा ठोठावायला अनेक जण टपलेले आहेत. त्यामुळे असा प्रसंग निर्माण होऊ नये, यासाठी कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण मराठा समाजाला देण्याची गरज आहे. त्यामुळे घाई करून काही साध्य होणार नाही", असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Chandrakant Patil and Manoj Jarange Patil
Shivsena Effect: शिवसेनेला उत्तर देण्यासाठी ३ आमदारांसह अख्खी भाजप एकवटली!

"मराठा समाजाला टिकणारे आरक्षण हवे असेल, तर त्‍यासाठी जो वेळ लागतो, तो दिला पाहिजे. आरक्षणाच्या विषयावर अनेकांनी अभ्‍यास केलेला आहे. त्यामुळे तज्‍ज्ञांची मतेदेखील जाणून घेतली पाहिजेत. या विषयातील जाणकारांनी मराठ्यांचा कुणबीत समावेश केला, तर हा निर्णय टिकू शकेल का ?, यासाठी सरकारला मदत केली पाहिजे", असेही पाटील म्हणाले.

"विद्यार्थ्‍यांना वसतिगृहांमध्‍ये सवलत, शिक्षण शुल्‍कामध्ये सवलत, व्‍यवसायासाठी कर्जाची मदत, अशा अनेक गोष्टी मांडल्या आहेत. आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार सकारात्‍मक आहे. सरकार आपला शत्रू आहे, अशी भूमिका आंदोलकांनी घेण्‍याची गरज नाही", असे मतही त्यांनी मांडले.

"मनोज जरांगे यांनी सभा घेण्याबरोबरच सरकारशी चर्चा करावी, कायद्यातील बारकावे समजून घ्यावेत, आरक्षणाला न्यायालयात कुणी आव्हान दिले तर काय होऊ शकते, हेदेखील जाणून घ्यावे, कारण फक्त श्रेय घ्यायचे म्हणून मराठा समाजाला आरक्षण दिल्याची घोषणा करता येईल, मात्र, ते टिकलेही पाहिजे. गायकवाड समितीने अभ्यास करून आरक्षणाचा मार्ग सुचविला होता. पण ते आरक्षणदेखील टिकले नाही. त्यामुळे काही तरी चिरकाल टिकणारे आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर सरकार ठाम आहे", असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

Edited by Ganesh Thombare

Chandrakant Patil and Manoj Jarange Patil
Dharmarao Baba Atram News : प्रफुल्ल पटेलांच्या गोंदियासाठी धर्मरावबाबा आत्राम यांना वेळ मिळेना...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com