Maratha Reservation : मागासवर्गीय आयोगाच्या एकाही सदस्याला कधीच भेटलेलो नाही; चंद्रकांत पाटील असे का म्हणाले?

Maratha Reservation Chandrakant Patil On State Backward Commission Issues : मराठा आरक्षणावरून मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे....
chandrakant patil
chandrakant patilSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Winter Session 2023 : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजाला आरक्षण देण्यावरून वातावरण तापत आहे. त्यातच राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीचा अभ्यास करण्यासाठीची जबाबदारी राज्य मागासवर्गीय आयोगावर दिलेली आहे. या आयोगाच्या काही सदस्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी समितीवर राज्यकर्त्यांचा दबाव असून, त्यामुळेच समितीचे सदस्य राजीनामा देत असल्याचा गंभीर आरोप एका सदस्याने केला आहे. या आरोपानंतर मराठा समाजासह इतर समाजातील नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया येत आहेत.

chandrakant patil
Manoj Jarange Patil : ... अन् मनोज जरांगे पाटलांच्या डोळ्यात अश्रू तरळले !

राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्थापन केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष असलेले चंद्रकांत पाटील आयोगावर दबाव टाकत आहेत. त्यामुळेच सदस्य राजीनामे देत असल्याचा आरोप आयोगाचे माजी सदस्य बालाजी किल्लारीकर यांनी केला होता. राज्यकर्ते एखाद्या समाजाला न्याय देण्यासाठी अशा पद्धतीने दबाव टाकत असतील तर चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी ओबीसीचे नेते आणि माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे यांनी केली होती.

आयोगाच्या सदस्यांवर अशा पद्धतीने टाकण्यात येणारा दबाव म्हणजे संबंधित मंत्र्याने आपल्या अधिकाराचा केलेला गैरवापर आहे, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी शेंडगे यांनी केली होती. हा सामाजिक न्यायचा प्रश्न असून, एखाद्या समाजाचे तीन तेरा वाजविण्यासाठी मंत्रिमंडळाचा वापर तुम्ही करणार का? असा प्रश्न शेंडगे यांनी उपस्थित केला होता.

मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांनी केलेले आरोप खोटे असल्याचे स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिले. मंत्रिमंडळ उपसमितीचे आपण अध्यक्ष आहे, हे खरे असले तरी समितीतील कोणत्याही सदस्यावर आपण दबाव टाकलेला नाही. मागासवर्गीय आयोगाच्या कोणत्याही सदस्याला आपण कधी भेटलोदेखील नाही, असे स्पष्टीकरण पाटील यांनी दिले आहे. आपल्यावर झालेल्या या आरोपांमुळे समाजामध्ये उगाचच काहीतरी गैरसमज निर्माण होता कामा नये. या आरोपांमुळे आपण मराठा समाजाच्या हितासाठीच प्रयत्न करतोय, असा समज होऊ शकतो. हे सर्व आरोप खोटे असून, आपण कधीही सदस्यांना भेटलो नसल्याचे ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांना सांगितले. तुम्ही प्रसार माध्यमांशी संवाद साधून तुमचे स्पष्टीकरण द्या, असे त्यांना सांगितल्यानंतरच आपण हे जाहीर करत असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Edited by Sachin Fulpagare

chandrakant patil
Maratha Vs OBC: कुणबीमधून आरक्षण हवंय, हातात वस्तारा घेणार का ? शेंडगेंनी मराठ्यांना पुन्हा डिवचलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com