महिला अधिकाऱ्याने रात्री केली बेधडक कारवाई, मंत्री शिंगणेंनी केले कौतुक…

त्या महिला अधिकारी (Lady Officer) आणि मंत्री डॉ. शिंगणे (Dr. Rajendra shingne) यांची आज महिला दिनी अन्न व औषध प्रशासन विभागात चर्चा होते आहे.
Dr. Rajendra Shingne
Dr. Rajendra ShingneSarkarnama

नागपूर : घड्याळीच्या काट्यावर काम करणारे बरेच शासकीय अधिकारी (Government Officer) आणि कर्मचारी पाहण्यात येतात. कामकाजाची वेळ संपल्यावर अभ्यागतांना घड्याळ दाखवले जाते. पण अन्न व सुरक्षा विभागातील एका महिला अधिकाऱ्याने वेळेचे बंधन झुगारून रात्री बेधडक कारवाई केली. अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingne) यांनी तात्काळ त्या अधिकाऱ्याच्या कार्याची दखल घेत त्यांचे तोंडभरून कौतुक केले.

त्या महिला अधिकारी आणि मंत्री डॉ. शिंगणे यांची आज महिला दिनी अन्न व औषध प्रशासन विभागात चर्चा होते आहे. एका गुप्त माहिती वरून सह आयुक्त कोकण, (Kokan) (अन्न) जिला ठाणे (Thane) यांनी उल्हासनगर (Ulhas Nagar) येथील एका खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्याची तपासणी करण्याचे आदेश अन्न सुरक्षा अधिकारी अरुण वीरकायदे यांना दिले. काल सोमवारी सौ. वीरकायदे या महिला अधिकाऱ्याने सदर क्रिष्णा ए -1 पाणीपुरी व भेलपुरी विक्री करणाऱ्या शॉपची तपासणी केली असता, अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करून अस्वछ अशा परिस्थितीत खाद्य पदार्थ विक्री करीत असल्याचे आढळले. शिवाय अन्न व सुरक्षा परवाना नसल्याचीही बाब उघडकीस आली. त्यांना तेव्हाच तात्काळ खाद्य पदार्थ विक्री बंद करण्याचे लेखी आदेश दिले.

मात्र सादर क्रिष्णा ए -1 पाणी पुरी वाल्याने बंदीचे आदेश झुगारून संध्याकाळी पुन्हा खाद्य पदार्थ विक्रीस सुरुवात केली. याबाबत सहआयुक्त कोकण सुरेश देशमुख (अन्न) यांना कळताच त्यांनी रात्री अन्न सुरक्षा अधिकारी अरुण वीरकायदे यांना याबाबत सूचना केली. अस्वछ असलेल्या ठिकाणी अवैधपणे खाद्य विक्री होत असल्याने आणि जनतेचे आरोग्य धोक्यात असल्याचे पाहून महिला अन्न सुरक्षा अधिकारी अरुणा वीरकायदे यांनी तात्काळ रात्री १०.४५ वाजता सदर खाद्य पदार्थ विक्री होत असलेल्या ठिकाणी धाड टाकली आणि बंदी नोटीस देऊनही सर्रास विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्याने तात्काळ विठ्ठलवाडी पोलिसांना पाचारण केले. पंचनामा करून रात्री ११.४५ मिनिटांनी सदर विक्रेत्या विरोधात एफआयआर दाखल केली.

Dr. Rajendra Shingne
कर्जमाफी होईलच, या आशेवर शेतकऱ्यांनी राहू नये : डॉ. राजेंद्र शिंगणे

रात्री १०.४५ वाजलेले असतानाही सदर महिला अधिकाऱ्याने कर्तव्य पूर्ण करण्यासाठी प्रथम प्राधान्य दिले आणि महिला म्हणून कुठेही वेळेचे भान न ठेवता जनतेच्या आरोग्यासाठी आणि अवैधपणे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर मध्य रात्री एफआयआर दाखल केला. अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना कळली. मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी तात्काळ सदर महिला अन्न सुरक्षा अधिकारी अरुणा वीरकायदे यांना फोन करून त्यांनी केलेल्या कारवाईचे कौतुक केले. शिवाय महिला दिनाचे औचित्य साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. डॉ. शिंगणे यांनी चांगल्या कार्याची तात्काळ दखल घेतली, त्याबद्दल सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये आनंद आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com