Amol Mitkari News : अजितदादा २०२४ मध्ये मुख्यमंत्री होतील; अमोल मिटकरींचा विश्वास

Ajit Pawar News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात हालचालींना वेग आला आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Baramati News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर कुणाची वर्णी लागणार ? याबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्क लावले जात आहेत. अजित पवार यांनी भाजप सोबत युती केल्यापासून त्यांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू आहे.

अशातच आता अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठे विधान केले आहे. २०२४ मध्ये अजित पवार (Ajit Pawar) जास्तीत जास्त आमदार निवडून आणतील. त्यानंतर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असे विधान मिटकरी यांनी केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. मिटकरी आज बारामतीच्या दौऱ्यावर होते.

Ajit Pawar
Pankaja Munde News : 'पंकजा मुंडेच्या नसानसात भाजप, त्या पक्ष सोडणार नाही'

अजित पवार कधी मुख्यमंत्री होतील ? असा प्रश्न मिटकरी यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, १४५ चा आकडा जोपर्यंत येणार नाही, तोपर्यंत कुणीही मुख्यमंत्री होऊ शकत नाही. मग ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) किंवा अजित पवार असाेत...तुम्हीपण घाई करू नका. अजित पवार हे २०२४ च्या निवडणुकीत जास्त आमदार निवडून आणतील आणि राज्याचे मुख्यमंत्री होतील.

अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असे मला एक कार्यकर्ता म्हणून वाटते. आमच्या पक्षाचे बंड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे बंड वेगळे आहे. असे आमचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले आहे. अजित पवार यांनीही त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे निवडणूक आयोग जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असले, असे मिटकरी यांनी स्पष्ट केले.

Edited by : Amol Jaybhaye

Ajit Pawar
Dudh Sangh News : जिल्हा दूध संघाची पंढरपुरातील तीन एकर जमीन काढली विक्रीस

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com