Amol Mitkari News: 'मोठा नेताच शरद पवारांची साथ सोडणार'; अमोल मिटकरींचा पलटवार

Sharad Pawar VS Ajit Pawar: कुणाचे किती आमदार कुणाच्या गटात जाणार आहेत, याचे उत्तर 25 किंवा 26 तारखेपर्यंत समजेल..
Amol Mitkari
Amol Mitkari Sarkarnama
Published on
Updated on

Akola News: राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटातील आमदारांबाबत बुधवारी मोठा दावा केला होता. अजितदादांच्या गटातील 15 आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचे विधान त्यांनी केले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात मोठी खळबळ उडाली. मात्र, आता अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी जयंत पाटलांवर पलटवार केला आहे.

"कुणाचे किती आमदार कुणाच्या गटात जाणार आहेत, याचे उत्तर 25 किंवा 26 तारखेपर्यंत समजेल, त्यांच्यातीलच एक मोठा नेता कुणाच्या संपर्कात आहे, याचे उत्तरही लवकरच मिळणार आहे", असे अमोल मिटकरी अकोल्यात माध्यमांशी बोलताना म्हणाले.

Amol Mitkari
NCP Crisis : मोठी बातमी ! जयंत पाटलांनी वाढवलं अजितदादांचं टेन्शन; 'ते' आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचा दावा

या वेळी लोकसभा, विधानसभेच्या जागावाटपाबाबत अमोल मिटकरींना प्रश्न विचारण्यात आला असता आपण यावर काही बोलणार नाही. याबाबत युतीमधील तिन्ही पक्षातील वरिष्ठ एकत्रित चर्चा करतील, असे त्यांनी सांगितले. दरम्यान,अमोल मिटकरींनी केलेल्या या दाव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते, ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

दरम्यान, अजित पवारांनी जुलैमध्ये बंड करत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. यानंतर दोन गटातील संघर्ष थेट निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला. आता दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. त्यामुळे दोन्ही गटांतील संघर्ष आगामी निडणुकीत आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

Edited by Ganesh Thombare

Amol Mitkari
Nilesh Lanke News: अजितदादांच्या लाडक्या नीलेश लंकेंची शरद पवारांच्या बैठकीत हवा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com