Bacchu Kadu News : 'या सरकारमध्ये ती क्षमता नाही'; बच्चू कडूंचा शिंदे सरकारला घरचा आहेर!

Cabinet Extension News : राज्यातील शिंदे सरकारला जवळपास वर्ष पूर्ण होत आले आहे.
Bacchu Kadu
Bacchu KaduSarkarnama
Published on
Updated on

Bacchu Kadu Cabinet Extension News : राज्यातील शिंदे सरकारला जवळपास वर्ष पूर्ण होत आले आहे. तरीही राज्य सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झालेला नाही. मंत्रीमंडळ विस्तारासाठी नवनवीन मुहूर्त सांगितले जात आहेत. मात्र, आता मंत्रीपदासाठी इच्छूक असणाऱ्या नेत्यांचा धीर सूटत चालला आहे. त्यातच आता आमदार बच्चू कडू यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.

बच्चू कडू म्हणाले, सरकारमध्ये ती क्षमता नाही आहे. मंत्रीमंडळ विस्ताराला वर्षभर लागेल, असे आम्हाला वाटले नव्हते. मात्र, ते नाही झाले. त्यांनी मंत्री केले नाही. मात्र, काही चांगली काम झाली आहेत, यामुळे मी नाराज नाही आहे. मंत्रीमंडळ विस्तार आता २०२४ नंतरच होईल, हे मी नेहमी सांगत असतो. ती क्षमता सध्या सरकारमध्ये नाही आहे, असे बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले.

Bacchu Kadu
NCP Meeting: विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर राष्ट्रवादी करणार दावा? पवारांच्या उपस्थित आमदारांची आज बैठक

तसेच जे अशा प्रकारे आमच्यावर आरोप करतात, गद्दार म्हणतात त्यांच्याविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत. मानहानीचा दावा दाखल करणार. मीही कोर्टात दाद मागणार. आम्ही विकासासाठी तिकडे गेलो. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) माणूस म्हणून खूप चांगले आहेत. मात्र, मुख्यमंत्री म्हणून ते कमी पडले म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला, असेही बच्चू कडू म्हणाले.

Bacchu Kadu
NCP Office Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त, काय आहे कारण ?

५० आमदारांची गळचेपी झाली आहे. विरोधक त्यांच्यावर खोके घेतले म्हणून आरोप करत आहेत. तर मित्रपक्ष भाजपकडून (BJP) त्यांना त्रास पण होत आहे. बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो आहे. मी माझ्याही मतदारसंघात पाहिले, असा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com