NCP Meeting: विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर राष्ट्रवादी करणार दावा? पवारांच्या उपस्थित आमदारांची आज बैठक

Legislative Council Opposition Leader : शिवसेनेच्या (ठाकरे गट) विधानपरिषदेच्या सदस्या मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
Uddhav Thackeray, Sharad Pawar
Uddhav Thackeray, Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Shivsena (UBT) And NCP : शिवसेनेच्या (ठाकरे गट) विधानपरिषदेच्या सदस्या मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाकरे गटाने तत्पुरीच पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत कायंदे यांची पक्षाच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी केली. दरम्यान, कायंदे यांच्या पक्षांतराने ठाकरे गटाची आता चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. विधानपरिषदेत ठाकरे गटाकडे असलेले विरोधी पक्षनेते पदावर आता राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आमदारांची आज मंगळवारी (ता. २०) बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबाबत विचार करू असे म्हटले आहे. तर अमोल मिटकरी यांनीही या पदावर दावा सांगितला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Uddhav Thackeray, Sharad Pawar
Manisha Kayande News: कायंदेंच्या पक्षांतराने ठाकरे गटाची डोकेदुखी वाढली; विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते पद सोडावे लागणार?

विधानपरिषदेत भाजपचे सर्वाधिक २२ सदस्य आहेत. त्यानंतर ठाकरे गटाचे ११ सदस्य होते. महाविकास आघाडतीतून जास्त सदस्य असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ठाकरे गटाला विरोधी पक्षनेते पद दिले. पक्षाने अंबादास दानवे यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केली. शिवसेनेत फूट पडल्यानंतर सर्वप्रथम ठाकरे समर्थक सदस्य विप्लब बाजोरिया यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. त्यानंतर मनीषा कायंदे यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटाची वाट धरली. त्यामुळे ठाकरे गटाला विधानपरिषदेत फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Uddhav Thackeray, Sharad Pawar
Solapur VidhanSabha Survey : सोलापुरात भाजपला पाच, तर राष्ट्रवादीला तीन जागा; शहाजीबापूंची दांडी गुल होणार, सोपलांना पुन्हा लॉटरी

सध्या ठाकरे गटाच्या डॉ. नीलम गोऱ्हे या विधानपरिषदेच्या उपसभापती आहेत. ते पीठासीन अधिकारी असल्याने त्यांची सभागृहाचे सदस्य म्हणून गणना होत नाही. विधानपरिषदेच्या नियमानुसार ज्या विरोधी पक्षाकडे सर्वाधिक सदस्य असतील, त्याच पक्षाला विरोधी पक्षनेतेपद दिले जाते. त्यानुसार ते ठाकरे गटाकडे होते. आता कायंदे यांच्या पक्षांतराने त्यांचे संख्याबळ कमी होऊन राष्ट्रवादी काँग्रेसएवढेच झाले आहे. यामुळे आता विरोधी पक्षनेतेपदाबाबत आम्ही नक्कीच विचार करू असे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.

Uddhav Thackeray, Sharad Pawar
Thackeray Celebrate Gaddar Din: ठाकरे गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना नोटीसा; कारण काय...?

या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमादारांची मुंबई येथे बैठक होणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विधानपरिषदेचे विरोध पक्षनेते पद आपल्याकडे घेण्याची मागणी करण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि ठाकरे गटाएवढेच असलेले विधानपरिषदेतील संख्याबळ या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com