आमदार बावनकुळे म्हणाले; होय, आम्ही चुका केल्या, सरकार आलं तर पुन्हा करू..

रस्त्याचे काम बंद का केले, ग्रामपंचायतीच्या लाइट बिल, रस्त्याचे वीज कनेक्शन का कापले, अशा प्रश्‍नांचा भडिमार आमदार बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सरकारवर (Maharashtra Government) केला.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama

वर्धा : आमच्यावर वारंवार आरोप केले जातात की, आमच्या सरकारच्या काळात आम्ही चुका केल्या. चांगली कामे करणे, शेतकऱ्यांना अखंडित वीज देणे चूक असेल, तर होय… आम्ही चुका केल्या, पुढे आमचं सरकार आलं की पुन्हा चुका करू. अन् शेतकऱ्यांना वीज मोफत देऊ, असे म्हणत आज माजी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे आज राज्य सरकारवर (Maharashtra Government) बरसले.

शेतकऱ्यांचे (Farmers) वीज कनेक्शन (Electricity) खंडित करण्याचा सपाटा वीज वितरण कंपनीने केला आहे, ते तात्काळ थांबवावे. पीक निघेपर्यंत वीज कनेक्शन तोडू नये, या मागणीसाठी हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार (Samir Kunawar) गेल्या पाच दिवसांपासून साखळी उपोषणाला बसले आहेत. आज या साखळी उपोषणाला चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी भेट दिली. या वेळेस त्यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) या उद्देशून होय आम्ही चूक केली, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना वीज मोफत दिली, ही चूक केली आणि पुढे आमचं सरकार आले तर परत ही चूक करू आणि शेतकऱ्यांना वीज बिल देणार नाही, अशी घोषणा केली.

सरकारने आमच्या या आंदोलनाला सकारात्मकतेने घेतलं नाही तर येत्या तीन तारखेला विधान परिषदेचे सभागृह सुरू होणार आहे. त्या सभागृहाच्या पायऱ्यांवर बसून आम्ही भाजपचे सर्व आमदार आंदोलन करू. त्यानंतरही सरकार जर मानलं नाही, तर आझाद मैदानावर हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा नेऊन सरकारला वेठीस धरू. सोबतच वैधानिक विकास महामंडळ का बंद केले, रस्त्याचे काम बंद का केले, ग्रामपंचायतीच्या लाइट बिल, रस्त्याचे वीज कनेक्शन का कापले, अशा प्रश्‍नांचा भडिमार आमदार बावनकुळे यांनी सरकारवर केला.

Chandrashekhar Bawankule
बावनकुळे यांचे थेट सोनिया गांधींना पत्र; बड्या नेत्याची तक्रार अन् केली मोठी मागणी

तथ्य असेल तर चौकशी लावा..

टीव्ही आणि इतर मीडिया समोर जाऊन आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा तथ्य असेल तर चौकशी लावा रोज रोज टीव्ही मीडियाला सांगण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न टीव्ही मीडियावर येऊ द्या महाराष्ट्राच्या बारा कोटी लोकांचे प्रश्‍न पुढे येऊ द्या. तुमच्याकडे गृहखातं आहे, तुमच्याकडे मुख्यमंत्री आहे. तथ्य असेल तक्रार द्या, चौकशी करा, दोषी आढळल्यास जेलमध्ये टाका. मीडियाचा वेळ महत्वाचा आहे. जनतेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न पुढे आले पाहिजे. पुढे काय करणार ते सरकारच्यावतीने सांगितलं पाहिजे, असे आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

कृषी पंपाचा वीज पुरवठा तात्काळ सुरू करा..

साखळी उपोषणाकडे दुर्लक्ष करून झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारी अधिकाऱ्यांवर आमदार बावनकुळे यांनी तीव्र रोष व्यक्त केला. गेल्या चार दिवसांपासून शेतकऱ्यांचे साखळी उपोषण सुरू असताना शासकीय अधिकाऱ्यांनी भेट देणे, समस्या समजावून घेणे गरजेचे आहे. परंतु एकाही अधिकाऱ्याने उपोषणकर्त्यांची भेट घेतली नाही, ही बाब योग्य नसल्याचे ते म्हणाले.

शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता महावितरणने थकबाकीच्या नावावर कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित केला. त्यामुळे रब्बी हंगामासोबतच उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. शेतीला पाणीच मिळाले नाही तर शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. यावेळी प्रामुख्याने भाजयुमो जिल्हाध्यक्ष वरुण पाठक, सुनील गफाट, अविनाश देव, अतुल तराळे, किशोर दिघे, प्रशांत बुर्ले, जयंत कावळे, आशिष पर्वत, निलेश पोहेकर आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com