
नागपूर : उत्तर प्रदेशच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. त्यातल्या त्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर या विधानसभा मतदारसंघात काय होणार, याकडे तर भाजपसह इतर सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून आहे. अशा परिस्थितीत गोरखपूरमध्ये आदित्यनाथ यांची धुरा सांभाळायला महाराष्ट्राचे ऊर्जावान नेते, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे गोरखपूरमध्ये डेरेदाखल झाले आहेत.
गोरखपूर (Gorakhpur) मतदारसंघासाठी ३ मार्चला मतदान होणार आहे. १९ फेब्रुवारीला नागपुरात (Nagpur) शिवजयंती साजरी केल्यानंतर आमदार बावनकुळे गोरखपूरकडे रवाना झाले. तेथे जाऊन त्यांनी योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली. तेथे जाताच त्यांनी ५ हजार युवा वॉरिअर्सशी संवाद साधला आणि त्यांना निवडणुकीच्या कामासाठी टिप्स दिल्या. महाराष्ट्रात प्रत्येक निवडणुकीत यश खेचून आणणारे बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी यावेळी उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) मोठी जबाबदारी सोपविली आहे.
५ हजार युवा वॉरिअर्स आणि १० हजार भाजप कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गोरखपूरच्या ५ लाख मतदारापर्यंत पोहोचण्याचे नियोजन त्यांनी केलेले आहे. त्यासाठी झपाटल्यागत त्यांचे काम सुरू आहे. देशभरातील जनतेचे लक्ष योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूरकडे लागलेले आहे. त्यामुळे त्यांची जबाबदारी मोठी आहे. बावनकुळे यांचे महाराष्ट्रातील काम बघून राष्ट्रीय नेतृत्वाने राज्याबाहेरील ही मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपविली आहे.
जबाबदारी मोठी, पण दडपण नाही..
प्रथमतः त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रसाद नड्डा यांचे आभार मानले. महाराष्ट्रातील माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर या विधानसभा मतदार संघाची जबाबदारी मिळाली, ही भाग्याची गोष्ट आहे.राष्ट्रीय नेतृत्वाने महाराष्ट्राच्या बाहेर आणि तेसुद्धा योगी आदित्यनाथ यांच्या मतदार संघासाठी प्रभारी म्हणून निवड केली. याचा आनंद आहे. जबाबदारी मोठी आहे, पण दडपण अजिबात नाही, असे आमदार बावनकुळे यांनी सांगितले.
महाविकास आघाडी सरकारचा केला निषेध..
देशाच्या शत्रूंना मदत करणाऱ्या आणि त्यांच्या समर्थनार्थ आंदोलने करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा आमदार बावनकुळे यांनी तीव्र निषेध केला. सध्या ईडीच्या कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांनी ताबडतोब मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि राज्य सरकारने तो घ्यावा, असे न झाल्यास देशात महाराष्ट्राचे नाव खराब होईल. राज्य सरकारने अशा मंत्र्याला वाचवण्याचा अजिबात प्रयत्न करू नये, असे आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.