Bhandara Political News : आमदार अपात्रतेच्या सुनावणीला भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना तब्बल अडीच सामोरे जावे लागले. केवळ पाठिंबा दिल्याचे उत्तर त्यांनी दिले आहे. दरम्यान अध्यक्षांकडून त्यांना आपली बाजू मांडण्यासाठी वकीलही दिला गेला आहे. पण आमदार भोंडेकर स्वतः वकील नेमणार आहेत. (These MLAs say that the notice is illegal)
आपण अपक्ष निवडणूक लढविली असल्याचे नोटीस मिळालेले अपक्ष आमदार म्हणत आहेत. त्यामुळे आम्हाला नोटीस बेकायदेशीर असल्याचे या आमदारांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे आमदार भोंडेकर हे सहयोगी सदस्य असल्याने त्यांना नोटीस पाठविली गेल्याचे राजकीय जाणकार सांगतात. ‘सरकारनामा’शी बोलताना भोंडेकर म्हणाले की काल त्यांच्या सुनावणीसाठी १७वा नंबर होता.
एक सही किती मोठे बदल घडवू शकते. याचे उदाहरण भंडाऱ्यात पाहायला मिळाले आहे. भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्या वेळी ठाकरे गटाला सहयोगी सदस्य म्हणून दिलेली सहीचा वापर विरोधकांकडून अपात्रतेसाठी करण्यात येत आहे.
अपात्रेसाठी महत्वाचा पुरावा म्हणून शिवसेनेचा ठाकरे गट भोंडेकरांच्या सहीचा वापर करत आहे. अपक्ष आमदार असतानाही त्यांना या सहीच्या पुराव्या मुळे विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू असलेल्या सुनावणीला हजर व्हावे लागत आहे. आता विधानसभा अध्यक्षांसमोर ठाकरे गटाचे ब्रम्हास्त्र ठरलेल्या सहापासून बचाव करण्यासाठी वकील करण्याची वेळ भोंडेकर यांच्यावर आली आहे.
तब्बल चार महिन्यांच्या कालावधीनंतर शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे गट व शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेचा मुहूर्त अखेर काल (ता. १४) निघाला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्या दालनात ही सुनावणी काल झाली. भंडारा (Bhandara) विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनाही या सुनावणी हजर राहण्यास नोटीस आली आहे.
सहा सप्टेंबरला भोंडेकरांना ही नोटीस आली. त्यांच्यासोबत आमदार बच्चू कडू व आमदार राजेंद्र यड्रावकर पाटील या अपक्ष आमदारांनाही नोटीस आल्याने भोंडेकरांसह हे दोन अपक्ष आमदार काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर सुनावणीसाठी हजर झाले. दरम्यान, अपक्ष आमदारांना नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हे आमदार सत्ताधारी पक्षाचे सहयोगी सदस्य असल्यामुळे नोटीस दिल्याची माहिती आहे.
ही सुनावणी दोन आठवडे लांबणीवर गेली असली तरी आमदार भोंडेकरांना तेव्हाही विधानसभा अध्यक्षांसमोर उभे राहावे लागणार आहे. त्यामुळे एक सही भोंडेकरांना भोवल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडीचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. या बंडात शिवसेनेसह काही अपक्ष आमदारांनीही शिंदेंना पाठिंबा दिला. त्यात भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांचाही समावेश आहे.
शिवसेना कुणाची हा वाद निवडणूक आयोगात पोहोचल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांकडून कार्यवाहीला सुरुवात झाली. आमदार अपात्रतेच्या या प्रक्रियेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाकडून अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासह माजी मंत्री बच्चू कडू, माजी मंत्री राजेंद्र यड्रावकर या अपक्ष आमदारांनाही अपात्रतेची नोटीस पाठविली आहे. त्यामुळे शिंदे गटातील ४० तर ठाकरे गटातील १४ आमदारांसह तीन अपक्ष आमदार काल (ता. १४) सुनावणीच्या वेळी उपस्थित होते
महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासातील आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या निर्णय प्रक्रियेला कालपासून सुरुवात झाली. या प्रकरणाचा निकाल केवळ राज्यासाठीच नव्हे, तर देशाच्या राजकारणातही महत्त्वाचा ठरणार आहे. शिवसेना कुणाची, हा वाद निवडणूक आयोगात पोहोचल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. परंतु त्यापूर्वी आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांकडून कार्यवाहीला काल पासून सुरुवात झाली आहे.
काल विधानसभा अध्यक्षांकडून दोन्ही गटाला कागदपत्रे सादर करण्यासाठी दोन आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, या शिवसेनेच्या दोन गटांच्या वादात अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर चांगलेच अडकले असून, आता होणाऱ्या प्रत्येक सुनावणीच्या वेळी त्यांना विधानसभा अध्यक्षांसमोर आपल्या वकिलासह हजर व्हावे लागणार आहे. त्यामुळे भोंडेकर यांच्यावरही अपात्रतेची टांगती तलवार आहे.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.