Tax Recovery : लाखांदूर नगर पंचायतीच्या कारभारावर संतापले माजी मंत्री डॉ. परिणय फुके

Parinay Fuke : वाढीव कर वसुली रद्द करीत पुनर्मूल्यांकनाची जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
Parinay Fuke with Yogesh Kumbhejkar.
Parinay Fuke with Yogesh Kumbhejkar.Sarkarnama
Published on
Updated on

Lakhandur Nagar Panchayat : नगर पंचायतीच्या बेकायदेशीर कर वसुली पद्धतीमुळे माजी मंत्री डॉ. परिणय फुके चांगलेच संतापलेत. वसुलीच्या प्रश्नावर भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांना त्यांनी पुनर्मूल्यांकन करण्याच्या सूचना केली. लाखांदूर नगर पंचायतीच्या अवाजवी कर वसुलीमुळे घरपट्टीच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या कर संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच लाखांदूरच्या दौऱ्यावर आलेल्या माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांची भेट घेतली.

लाखांदूर नगर पंचायतीची हेकेखोरी नागरिकांनी डॉ. फुके यांना सांगितल्यावर त्यांनी तातडीने जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासोबत बैठक घेतली. डॉ. फुके यांच्या या पुढाकारामुळे लाखांदुरवासियांना सुखद धक्का बसला.

Parinay Fuke with Yogesh Kumbhejkar.
परिणय फुकेंकडून आव्हाडांची लायकी काढत समाचार | Parinay Fuke On Jitendra Awhad

लाखांदूर नगर पंचायतीने शासनाच्या आदेशाला न जुमानता स्वतःच्या मर्जीनुसार बांधकाम प्रकार, झोन, भाड्यावरील शुल्क यात 20 ते 30 टक्के वाढ केली आहे. अचानक करण्यात आलेल्या या करवाढीने लाखांदुरवासियांचे आर्थिक बजेट कोलमडले. लाखांदूर नगर पंचायतीच्या या हिटलरशाही विरोधात कर संघर्ष समिती तयार करण्यात आली. समितीच्या सदस्यांनी शनिवारी (ता. तीन) माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांची भेट घेतली.

करवसुलीच्या चुकीच्या पद्धतीने होत असल्याबाबत नागरिकांनी माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांच्या निदर्शनास आणून दिले. नगरवासीयांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर लाखांदूर नगरमध्ये होत असलेल्या करवाढीबाबत डॉ. फुके यांनी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर व संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली. लाखांदूर नगरपंचायतीचे सर्वेक्षण खासगी कंपनीने केले होते. सर्वेक्षण पूर्णपणे चुकीचे झाले आहे. जुन्या नियमानुसार करप्रणाली असायला हवी, ही प्रमुख बाब डॉ. फुके यांनी हेरली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लाखांदूर नगर पंचायतकडून नागरिकांची होणारी लूट आणि करवाढीच्या प्रक्रियेवर बंदी आणत पुनर्मूल्यांकन करण्यास त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. नगर पंचायत लाखांदूरमध्ये शासनाच्या कोणत्याही सूचनेशिवाय करवाढ करण्यात आली आहे. नगर पंचायतीने स्वत: बांधकामाचा प्रकार ठरविला आहे. झोन व भाड्याबाबत करातही वाढ केली आहे.

करवाढ करताना कोणतीही सुनावणी व वस्तुनिष्ठ तपासणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे करवाढ तत्काळ थांबवित वस्तुनिष्ठ समायोजन व पुनर्मूल्यांकन करण्यात यावे अशी नागरिकांची मागणी आहे. लाखांदूर कर संघर्ष समितीचे अध्यक्ष मोरेश्वर बोरकर, कोषाध्यक्ष मुकेश सहजवानी, सचिव वसंत इंचीलवार, दामोदर जांभुळकर, वामनराव वझाडे, बंटीजी सहजवानी, नानाजी पिलारे, रमेशजी भैय्या, बालकिशन गोडसेलवार, धनराज हटवार, रवीजी शेंडे, प्रभूजी जांभुळकर, आदित्य बगमारे, शुभम दुनेदार, फागोजी कडीखाये, बबलू नागमोती, मंगेश करंडे, वनराज हाथझाडे, मुरलीधर गायकवाड, दामोदर नांदेकर, भाऊराव पारधी यांनी जिल्हाधिकारी व लाखांदूर नगर पंचायतीच्या अधिकाऱ्यांपुढे अनेक पुरावे सादर केले.

Edited By : Prasannaa Jakate

Parinay Fuke with Yogesh Kumbhejkar.
Dr. Fuke's Janata Durbar : डॉ. फुकेंच्या दरबारातून मंत्रालयात पोहोचला ‘आशा’चा मुद्दा, जीआर लवकरच निघणार !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com