Shivsena News : मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर; श्रीकांत शिंदेंच्या मेहुण्याच्या उमेदवारीला शिवसेनेतील 'या' बड्या नेत्याचा विरोध

Maharashtra Political News : कोकणातील गुहागर मतदारसंघातून खासदार श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांनी उमेदवारी देण्याचे निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. विपुल कदम यांच्या उमेदवारीमुळे गुहागर विधानसभा क्षेत्रातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
Eknath Shinde, Shrikant Shinde, Ramdas Kadam
Eknath Shinde, Shrikant Shinde, Ramdas Kadam Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या बैठकींना वेग आला आहे. महाविकास आघाडी व महायुतीच्या जागावाटपाची चर्चा सध्या अंतिम टप्प्यात आली आहे.

तोंडावर आलेल्या विधानसभेच्या जागावाटपावर चर्चा करण्यासाठी महायुती व महाविकास आघाडीकडून जागावाटपाची चर्चा युद्धपातळीवर सुरु आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.

त्यातच शिवसेना (Shivsena ) शिंदे गटाकडून खासदार श्रीकांत शिंदे (Shrikanat Shinde) यांच्या मेहुण्याला विधानसभेच्या मैदानात उतरवण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, या उमेदवारीला आता शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam ) यांनी विरोध केला. त्यामुळे येत्या काळात यावर मुख्यमंत्री शिंदे काय निर्णय घेणार याची उत्सुकता लागली आहे.

कोकणातील गुहागर मतदारसंघातून खासदार श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांनी उमेदवारी देण्याचे निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. विपुल कदम यांच्या उमेदवारीमुळे गुहागर विधानसभा क्षेत्रातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मेहुण्याला विधानसभेच्या मैदानात उतरवण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, या उमेदवारीला आता शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री रामदास कदम यांनी विरोध दर्शविला आहे.

एकनाथ शिंदेंचे पुत्र आणि शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मेहुण्याला शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कोकणातील गुहागर विधानसभा मतदारसंघ हा सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदु झाला आहे. कारण, गुहागरमधून खासदार श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांनी उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे.

Eknath Shinde, Shrikant Shinde, Ramdas Kadam
MVA News : मेव्हुण्या-पाहुण्याच्या वादात पवार-ठाकरेंच ठरलं; ‘या’ उमेदवाराला मिळणार राधानगरीत संधी

विपुल कदम यांच्या उमेदवारीमुळे गुहागरमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी रविवारी वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे यांना भेटायला गेले होते. यावेळी गुहागर विधानसभेसाठी विपुल कदम यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते. मात्र, या उमेदवारीला रामदास कदम यांनी स्पष्ट शब्दात विरोध केला आहे.

विपुल कदम यांचा लागणार कस

ठाकरे गटाचे भास्कर जाधव हे गुहागर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे शिंदे गटाने विपुल कदम यांना रिंगणात उतरवल्यास विधानसभा निवडणुकीत त्यांना भास्कर जाधव यांच्याशी दोन हात करावे लागतील.

विपुल कदम यांच्या पाठीशी श्रीकांत शिंदे यांची संपूर्ण ताकद उभी राहणार असली तरी भास्कर जाधव यांच्यासारख्या आक्रमक नेत्याचा सामना करताना विपुल कदम यांचा कस लागण्याची शक्यता आहे.

गुहागर मतदारसंघात पाय ठेवणार नाही

विपुल कदम यांना सीट देऊन एकनाथ शिंदे शिवसेनेत (Shivsena) नवीन प्रथा सुरू करणार असतील तर शिवसैनिकांना ती रुचेल, असे वाटतं नाही. अचानक सीट दिली तर नियमित काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर अन्याय होईल, अशा शब्दात रामदास कदम यांनी विपुल कदम यांच्या उमेदवारीला स्पष्ट शब्दात विरोध केला.

नातेवाईक म्हणून विपुल कदम यांना सीट दिली तर, त्याचा पराभव नक्की असल्याचंही कदम यांनी स्पष्टच सांगितले. तसेच, विपुल उमेदवार असेल तर त्याला माझ्या शुभेच्छा, पण मी गुहागर विधानसभा मतदारसंघात पाय ठेवणार नाही, असेही रामदास कदम म्हणाले.

विपुल कदम यांनी सुरु केली तयारी

दरम्यान, शिंदे गटाकडून पितृपक्ष संपल्यानंतर विपुल कदम यांची उमेदवारी जाहीर केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, ही बातमी बाहेर येताच विपुल कदम हे कामाला लागल्याचे दिसत आहे. कारण, विपुल कदम यांच्याकडून गुहागरमध्ये 'धर्मवीर-2' या चित्रपटाचे मोफत खेळ आयोजित करण्यात आले आहेत.

Eknath Shinde, Shrikant Shinde, Ramdas Kadam
Eknath Shinde News : लाडक्या बहिणींना दिलेले पंधराशे रुपये तुमच्या डोळ्याला टोचतात; ठाकरेंवर मुख्यमंत्री शिंदेंचा घणाघात

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com