सतत गैरहजर राहणारे आमदार रवी राणा शुक्रवारी पोलिसांकडे जाणार…

महापालिका आयुक्तांवर शाईफेक प्रकरण झाले होते. त्या प्रकरणात आरोपीमध्ये आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांचेही नाव टाकण्यात आले होते.
MLA Ravi Rana
MLA Ravi RanaSarkarnama

अमरावती : राजापेठ येथील उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा पुतळा आमदार रवी राणा यांनी उभारला होता. त्यानंतर महानगरपालिकेने कारवाई करीत हा पुतळा तेथून हटवला. त्यानंतर झालेल्या वादात बडनेऱ्याचे आमदार रवी राणा युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आयुक्तांवर शाई फेकली होती. नंतर त्या प्रकरणात आमदार राणांना अटकपूर्व जामीन घ्यावा लागला. तेव्हापासून त्यांनी पोलिस ठाण्यात हजेरी लावली नव्हती. अखेर गुरूवारी ७ एप्रिलला ते आता पोलिस ठाण्यात हजर राहणार आहेत.

यासंबंधी त्यांचे वकील दीप मिश्रा यांनी सांगितले की, अमरावती (Amravati) महापालिका आयुक्तांवर शाईफेक प्रकरण झाले होते. त्या प्रकरणात आरोपीमध्ये आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांचेही नाव टाकण्यात आले होते. प्रकरणात त्यांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे. आज राजापेठ विभागाचे साहाय्यक पोलिस आयुक्तांनी त्यांना तपासाच्या कामासाठी बोलावले होते. २ एप्रिल २०२२ ला तपास अधिकारी असलेले साहाय्यक पोलिस आयुक्तांनी आमदार राणा यांना व्हॉट्सॲपवर नोटीस पाठवली होती आणि त्यांना ५ एप्रिलला म्हणजे आज तपासासाठी बोलावले होते. पण आज ते शासकीय कामानिमित्त दिल्लीला असल्यामुळे येऊ शकले नाही.

आमदार राणा यांना ही नोटीस ४ एप्रिल रोजी रात्री १० वाजता व्हॉट्सॲपवर मिळालेली आहे. म्हणून ते आज प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या वतीने मी येथे साहाय्यक पोलिस आयुक्तांच्या समक्ष उपस्थित झालो आणि त्यांना रितसर पत्र दिले. त्यामध्ये आमदार रवी राणा येत्या ७ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता त्यांच्या समक्ष हजर होतील आणि तपासाला पूर्ण सहकार्य करतील, असे ॲड. दीप मिश्रा यांनी सांगितले.

MLA Ravi Rana
नवाब मलिकांनंतर आता 'या' मंत्र्याचा १२०० कोटींचा घोटाळा बाहेर काढणार- रवी राणा

महानगरपालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली होती. त्यामुळे आमदार रवी राणा यांच्यासह अकरा जणांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर या प्रकरणी आमदार रवी राणा यांनी अमरावती जिल्हा सत्र न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला होता, मात्र अटकपूर्व जामीन दिल्यानंतर एकही वेळ आमदार रवी राणा पोलिस ठाण्यात हजर झाले नाही. त्यानंतर २ एप्रिल रोजी आमदार रवी राणा यांना पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र आमदार रवी राणा गैरहजर होते. आजही साहाय्यक पोलीस आयुक्त भारत गायकवाड यांच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले होते. मात्र ते स्वतः हजर न राहता त्यांचे वकील आज हजर झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com