Amit Thackeray : अमित ठाकरेंना पाहिले अन् जय मोलोकारच्या वडिलांचा अश्रूंचा बांध फुटला!

Amit Thackeray meet shreekrishna malokar :आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना मालोकार कुटूंबाची भेट घेण्याचे आवाहन केले होते. दरम्यान गुरुवारी राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी दौरे करत जय मोलोकारच्या वडिलांची भेटी घेतली.
Amit Thackeray meet  shreekrishna maloka
Amit Thackeray meet shreekrishna malokasarkarnama
Published on
Updated on

योगेश फरपट

Amit Thackeray News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी जय मालोकार यांच्या कुटुंबीयांची आज (गुरुवारी) भेट घेतली. या भेटीत मुलाच्या आठवणीत जय मोलोकारचे वडीलांना अश्रू अनावर झाले होते.

तीन दिवसांपूर्वी मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. मनसे पदाधिकारी जय मालोकर याने अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटत होते. जय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला होता.

आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना मालोकार कुटूंबाची भेट घेण्याचे आवाहन केले होते. दरम्यान गुरुवारी राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी पक्षाचे दौरे रद्द करीत अकोल्यात आले होते.त्यांनी अकोला येथे दुपारी पोहचून मनसे पदाधिकाऱ्यांसोबत आधी चर्चा केली. त्यानंतर जय मालोकार यांच्या गावी निंबी मालोकार येथे जयचे वडीव श्रीकृष्ण मालोकार यांची भेट घेत मालोकार कुटुंबीयांचे सात्वंवन केले.

यावेळी मालोकार यांच्या कुटूंबातील सदस्यांसह अकोला जिल्हा मनसे जिल्हाध्यक्ष राजेश काळे, पंकज साबळे, विजय मालोकार, सौरभ भगत, सतीष फाले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Amit Thackeray meet  shreekrishna maloka
Congress News : महायुती सरकारला जनता कंटाळली; काँग्रेसच्या नेत्याने केली टीका

राजकारण करायला आलो नाही!

अमित ठाकरे यांनी अकोला दौऱ्या दरम्यान माध्यमांशी बोलायचे टाळले. मात्र माध्यमांनी त्यांना निंबी मालोकार येथे गाठून दोन दिवसातील घडामोडीवर प्रश्न विचारले. तेव्हा त्यांनी 'मी येथे राजकारण करायला आलो नसून माझ्या कार्यकर्त्याच्या कुटूंबीयांच्या भेटीला आलो आहे. त्यांचे दुःख मी माझे समजतो. भविष्यात नक्कीच बोलेल', अशी प्रतिक्रिया दिली.

मनसे आमच्या पाठीशी

अमित ठाकरे यांनी भेट घेतली. मनसे पदाधिकारी आमच्या पाठीशी आहे याचे समाधान आहे. माझ्या भावाच्या मृत्यूची चौकशी केली जाईल. स्वतः लक्ष घालून दोषींवर निश्चित कारवाई केली जाईल असे आश्वासन अमित ठाकरे यांनी दिले तसेच आर्थिक मदत केल्याचे जयचा भाऊ विजय मालोकार यांनी सांगितले.

Amit Thackeray meet  shreekrishna maloka
2000 Rs Note News : दोन हजारांच्या 97.92 टक्के नोटा बँकांमध्ये झाल्या जमा, अन् आता जनतेमध्ये उरल्या..!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com