
Mohadi Tax News : भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी नगरपंचायत प्रशासनाने अतोनात वाढविलेल्या गृहकराविरोधात नगरसेवकांनी अपील केले नाही. याचा परिणाम असा झाला की, पाचपट वाढलेला कर अखेर आता लागू झाला. त्यामुळे गृहकराविरोधी संघर्ष समिती मोहाडी शहरवासीयांच्या मदतीने न्यायालयात जाणार आहे.
न्यायालयातच आपल्याला न्याय मिळेल, या आशेने मोहाडी नगरपंचायतीच्या विरोधात मोहाडी शहरवासीयांनी एल्गार पुकारल्याचे दिसून येत आहे. लाखांदूर येथील करवाढी विरोधात नागरिकांनी पुकारलेल्या लढ्यानंतर आता मोहाडी शहरातील नागरिकही या विषयासाठी पुढे आले आहेत. मोहाडीसारख्या लहानशा शहरात जिथे कारखाने नाहीत, शहरात पाहिजे तशी कोणतीही सुखसुविधा उपलब्ध नाही, तरी घर टॅक्समध्ये अतोनात वाढ करण्यात आली.
हा एकप्रकारे मोहाडीवासीयांना सर्रास लुटण्याचा प्रकार असल्याची टीका आता होत आहे. मोहाडी नगरपंचायत भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून नेहमी चर्चेत असते. या निमित्ताने पुन्हा एकदा ही चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे शहरवासीयांमध्ये करवाढ कमी करण्यासाठी लढा लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी घर टॅक्स कमी करण्याबाबतचा ठराव नामंजूर केला. तेव्हा नियमानुसार नगर पंचायतीने अपील दाखल का केले नाही, असा प्रश्न आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जनआक्रोश मोर्चा, अनेक निवेदन देऊनही नगरपंचायतीला जाग आली नाही; परंतु घनकचऱ्याची निविदा काढायची व नंतर फायदा पदरात पडत असल्याचे दिसताच रद्द करायची हा प्रकार कोणत्या गटात मोडतो, असा प्रश्नही जनतेकडून विचारला जात आहे. आता नगर विकास संघर्ष समिती मोहाडी नगरवासीयांना सोबत घेऊन मोठे आंदोलन उभे करण्याच्या पवित्र्यात आहे. घर टॅक्स कमी करण्याकरिता उच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारीही नगर विकास संघर्ष समितीने चालविली आहे.
यामध्ये खुशाल कोसरे, बबलू सय्यद, पुरुषोत्तम पात्रे, अनिल न्यायखोर, श्याम चौधरी, विलास वाडीभस्मे, सुभाष भाजीपाले, गणेश निमजे, रमेश गोंडाणे आदर्श बडवाइक, सुरेंद्र बारई, नारायण निखारे, फिरोज शेख, बबलू शेख, ग्यानेंद्र आगाशे, दामू निखारे, विनोद नंदनवार, मुस्ताक कुरेशी, हिरालाल नंदनवार, रवी थोटे, अनंतराम मेश्राम, सोनू इलमकर यांच्यासह काही नागरिकांनी ‘सरकारनामा’शी बोलताना न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.