
Mohan Bhagvat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी धर्माला गुरुत्वाकर्षणाची उपमा दिली आहे. त्याचबरोबर मानव धर्माला हिंदू धर्म म्हणतात असं सांगताना हिंदू धर्माचं नवं मॉडेल तयार झालं पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी विविध अंगानं धर्माची व्याख्या केली.
भागवत म्हणाले, "धर्म कार्य हे पवित्र असतं भारतीय लोक ज्याला धर्म म्हणतात ते सत्य आहे, ते माना अथवा नका मानू नका पण ते काम करतं असतं. गुरुत्वाकर्षण ज्या पद्धतीनं मानलं नाही तरी काम करत असत, त्याचप्रमाणं धर्माचं काम असतं. मनुष्य जीवनात अनेक प्रसंग येत असतात. कोणतं संकट आलं तरी अपेक्षा पूर्ण होत नाही. यातून धैर्य तुटल्यासारखं होतं, त्यासाठी लोक चांगले मार्ग सोडतात, पण पुरुषार्थी लोक हे मार्ग न सोडता धर्म कर्तव्य मानून काम करत असतात. आपण अश्या प्रसंगात शक्ती-युक्तीने मार्ग काढतो. माणसानं आपलं कर्तव्य करत राहावं यासाठी धर्मनिष्ठा पक्की असली पाहिजे, धर्मासाठी अनेकांनी बलिदान दिलं मृतांचे ढीग लागले पण धर्म सोडला नाही. छावा चित्रपट आपण पहिला, आपल्यासमोर याचा आदर्श आहे.
आपला धर्म सत्यावर आधारीत आहे, आपण वेगवेगळे दिसत असलो तरी एक आहोत. धर्म हा एकतेचा आविष्कार आहे, आपण विविध आहोत पण एक आहोत. सर्वांनी हा धर्मपणा स्वीकारायला हवा असं आवाहन करताना भागवतांनी म्हटलं की, आईनं न जेवताही मुलांनी खाल्लं की आई जेवली अशीच म्हणते ते असत्य नसतं. आपल्यामध्ये वेगळेपण दिसत असलं तरी आपण एक आहोत, सर्वांप्रति एक असावं, दुसऱ्याचा मार्ग बदलण्याची गरज नाही, जायचं एकाच ठिकाणी आहे. या धर्माची आवश्यकता आहे, हा हिंदू धर्म वास्तवमध्ये हिंदूंच्या लक्षात आल्यानं तो आचरणात आणला.
परिस्थितीनुरूप धैर्य आवश्यक आहे, मानव धर्माला हिंदू धर्म म्हणतात. हिंदू धर्मावालं मॉडेल तयार झालं पाहिजे. अनेक कार्य होत असताना भवन जिथं होतं ते तिथेच असाव, त्याला भवनाप्रमाणं ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. हे कार्य केवळ देवासाठी नसतं, धर्म ठीक राहिल्यास समाजात शांतता राहील. 'सत्य धर्मा'चा निश्चय करणारं आहे दायित्व आहे, त्यासाठी आवश्यक सहकार्य केलं पाहिजे, हाच धर्म आहे, असंही पुढे मोहन भागवत यांनी म्हटलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.