Monsoon Session 2023 : नीलम गोऱ्हेंना नैतिकदृष्या पदावर राहता येणार नाही !

Pavsali Adhiveshan 2023 : प्राथमिक सदस्यत्व सोडल्यामुळे पक्षाच्यावतीने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
Ambadas Danve and Nilam Gorhe
Ambadas Danve and Nilam GorheSarkarnama
Published on: 
Updated on: 

Monsoon Session of Maharashtra Assembly 2023 : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व सोडलेले आहेत. प्राथमिक सदस्यत्व सोडल्यामुळे पक्षाच्यावतीने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून त्यांना निलंबित करण्यात आले आहे, असे विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यानंतर सांगितले. (This decision has been taken on behalf of the party)

काही दिवसांपूर्वी त्यांनी पक्षांतर केल्याच्या बातम्या आम्ही वृत्तपत्र व विविध माध्यमांमधून ऐकल्या आहेत. त्यामुळे पक्षाच्यावतीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने त्यांची उपसभापती पदी निवड करण्यात आली होती, त्यामुळे पक्षाच्या अधिकाराअंतर्गत पक्षांतर केल्यामुळे त्यांच्या विरोधात पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्याची कार्यवाही करण्यात आली असल्याचे दानवे म्हणाले.

सभागृहाबाहेर माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले, महाविकास आघाडीतर्फे विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याविरोधात आज डिसकॉलिफिकेशनचा ठराव मांडण्यात आलेला आहे. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व सोडल्यामुळे नैतिकदृष्ट्या त्यांना या पदावर बसता येणार नाही. सरकार आणि विधान परिषदेच्या उपसभापती विरोधी पक्षांविरोधात दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

शेकापचे सदस्य जयंत पाटील (Jayant Patil) यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर जोरदार आक्षेप घेतला. सभागृहाचा अधिकारी व्यक्ती ज्यावेळी आसनावर असतात, त्यावेळी त्यांचा पक्ष फुटलेला नसतो. पक्ष सदस्यत्व आपोआप जातं, असे पाटील म्हणाले. त्यावर सभापतींवर अशा प्रकारे आक्षेप घेता येत नाही. त्याचेही काही नियम आहेत. असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सांगितले. त्यानंतर विरोधकांनी सभागृहात गदारोळ सुरू केला.

Ambadas Danve and Nilam Gorhe
Opposition On Shinde-Fadnavis: 'घटनाबाह्य, कलंकीत' म्हणत विरोधकांचा थेट शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल

तुम्हाला गोंगाट करायचा असेल तर करा. पण नियमांमध्ये आपण आजचे कामकाज करून घेऊ. तुम्ही गटनेत्यांच्या बैठकीला आले असते, तर तुम्हाला मी वेळ निर्धारित करून दिली असती. अगदी माझ्या विरोधात जरी तुम्हाला अविश्‍वास दाखवायचा असेल, तरीही ते करता येईल. पण आता तुम्हाला या चर्चेसाठी वेळ देता येणार नाही, असे उपसभापती नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी सांगितले. त्यानंतर विरोधकांनी गदारोळ करत सभात्याग केला. त्यानंतर अध्यादेश मांडण्यात आले. शोकप्रस्ताव झाल्यानंतर सभागृह दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.