Privacy Rights Violation Case : महिलेच्या घरात रात्री प्रवेश करणे पोलिसांना भोवलं, कारवाईच ठरवली बेकायदेशीर; उच्च न्यायालयाचा थेट राज्य शासनालाच दणका...

Maharashtra Government Fined in Women's Privacy Rights Violation Case : गुन्ह्याच्या तपासाच्या नावाखाली एका महिलेच्या घरी रात्री उशीरा जाणे आता पोलिसांना चांगलेच महागात पडल्याचे समोर आले आहे.
Police
PoliceSarkarnama
Published on
Updated on

Nagpur news : गुन्ह्याच्या तपासाच्या नावाखाली रात्री उशिरा एका महिलेच्या घरात वारंवार प्रवेश करून तिची चौकशी करणे आणि तिचा मोबाइल बेकायदेशीररीत्या ताब्यात घेणे पोलिसांना चांगलेच भोवले आहे. याप्रकरणी महिलेच्या गोपनीयतेच्या आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचा ठपका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ठेवला आहे. तसेच, राज्य शासनाला दहा हजार रुपये दंड ठोठावला.

खापा कारवाई विरोधात खुशबू इद्द्रिस खान आणि इद्द्रिश मंजर खान यांनी याचिका दाखल केली होती. या प्रकरणावर न्यायमूर्ती ऊर्मिला जोशी-फाळके आणि न्यायमूर्ती निवेदिता मेहता यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकेनुसार, खापा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या एका अपघाताच्या गुन्ह्यात इद्द्रिश खान यांची चौकशी सुरू होती. गुन्ह्यात इद्द्रिस यांचे नाव आरोपी म्हणून नसूनही पोलिसांनी त्यांच्या घरी वारंवार भेटी दिल्या, असा आरोप होता.

रकमेची वसुली अधिकाऱ्याकडून न्यायालयाने राज्य शासनाला संबंधित महिलेला दहा हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. ही रक्कम दोन महिन्यांत न दिल्यास त्यावर वार्षिक आठ टक्के व्याज देण्याचेही आदेश देण्यात आले. तसेच, संबंधित पोलिस अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्याकडून ही रक्कम वसूल करण्याचे स्वातंत्र्य राज्य सरकारला देण्यात आले आहे.

Police
Maharashtra Government : जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्याआधी ही बातमी वाचाच; अधिकाऱ्यांच्या कामांचे फेरवाटप, कुणाकडे कोणती कामे? वाचा संपूर्ण यादी...

पोलिस आयुक्तांकडे तक्रार करूनही कारवाई न झाल्याने याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुनावणीनंतर महिलांचा सन्मान, गोपनीयता आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण करणे ही पोलिस यंत्रणेची घटनात्मक जबाबदारी आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. तसेच, पोलिसांची कारवाई अवैध ठरवली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Kokare Maharaj Case
Defamation Case; Sushma Andhare and Rupali Chakankar
Balasaheb Thorat Thane Land Case
Archana Patil
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com